Cotton Poojan Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Poojan : एल्गार यात्रेदरम्यान शेतकऱ्यांसह सोयाबीन-कापसाचे पूजन

Farmers Elgar yatra : सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या उद्देशाने रविकांत तुपकर यांनी ‘एल्गार रथयात्रा’ सुरू केली आहे.

Team Agrowon

Buldana News : सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या उद्देशाने रविकांत तुपकर यांनी ‘एल्गार रथयात्रा’ सुरू केली आहे. दरम्यान, दिवाळीच्या रात्री एकीकडे लक्ष्मीपूजन होत असताना तुपकर व शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन-कापसाचे पूजन केले. अशा प्रकारे आगळीवेगळी दिवाळी साजरी करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

रविकांत तुपकर यांची सध्या सोयाबीन-उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘एल्गार रथयात्रा’ सुरू आहे. ५ नोव्हेंबरला संतनगरी शेगाव येथील संत गजाननाचे दर्शन घेऊन ही यात्रेला सुरुवात झाली. गावोगावी फिरून बैठका, सभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.

दररोज वेगवेगळ्या तालुक्यात मुक्काम करीत ही यात्रा पुढे जात आहे. दिवाळीच्या दिवशी रविवारी (ता.१२) ही यात्रा चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावात मुक्कामी होती.

दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाला घरी न जाता आपल्या कुटुंबीयांसह शेतकऱ्याच्या शेतात अंधारात सोयाबीन व कापसाचे पूजन करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.

सोयाबीन, कापूस हीच शेतकऱ्यांची लक्ष्मी आहे. परंतु सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. त्यामुळे तुपकर यांनी देखील आपली दिवाळी शेतातील अंधारात साजरी केली. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Project: आनंदवाडी प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात १०३ हेक्टरने वाढ

Veterinary Services: पशुवैद्यक हे अन्न, आरोग्याचे रक्षक

Fertilizer Dealers Protest: नाशिकमध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बेमुदत बंद

Natural Farming Training: नैसर्गिक शेतीसाठी शेतकरी शाळांचा प्रभावी उपक्रम

Groundwater Recharge: विहिरींचे पुनर्भरण काळाजी गरज! कसे करावे पुनर्भरण?

SCROLL FOR NEXT