Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सोयाबीन क्षेत्रात दोन हजारने वाढ, तर तुरीत तीन हजार हेक्टरने घट

Team Agrowon

Hingoli News : कृषी व महसूल विभागाकडून गुरुवारी (ता. ५) हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या (२०२४) खरीप हंगामातील अंतिम पेरणी क्षेत्र निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार यंदा जिल्ह्यात ३ लाख ५४ हजार ४८५ हेक्टरवर (९८.१८ टक्के) पेरणी झाली आहे. यंदाच्या खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्रात केवळ सोयाबीन पिकांचे पेरणी क्षेत्र ७९.२१ टक्के आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात २ हजार ८८५ हेक्टरने वाढ झाली आहे. कपाशी, मूग, तूर, उडीद, ज्वारी, बाजरीच्या क्षेत्रातील घट यंदाही कायम आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

गतवर्षीच्या (२०२३) खरिपाच्या ३ लाख ५९ हजार ८७ हेक्टरच्या यंदा ४ हजार ६०२ हेक्टरने घट झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ५६ हजार ४०४ हेक्टर असतांना प्रत्यक्षात २ लाख ८० हजार ७२९ हेक्टरवर (१०९.४९ टक्के) पेरणी झाली.

कपाशीची ३८ हजार ८२१ हेक्टरपैकी ३० हजार ३८४ हेक्टरवर (७८.२७ टक्के) लागवड झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या लागवडीत ९६३ हेक्टरने घट झाली आहे. तुरीची ४३ हजार ३०६ पैकी ३० हजार ९९७ हेक्टर (६८.४२ टक्के), मुगाची ७ हजार ७८१ पैकी ५ हजार २९३ हेक्टर (६८.०२ टक्के) पेरणी झाली असून, यंदा मुगाच्या पेरणीत ४०८ हेक्टरने घट झाली आहे.

उडदाची ५ हजार ८७९ पैकी ३ हजार ९९५ हेक्टर (६६.४२ टक्के) पेरणी झाली असून, यंदा उडदाच्या पेरणीत ६०५ हेक्टरने घट झाली आहे. ज्वारीची ५ हजार ५०३ पैकी २ हजार २४२ हेक्टरवर (४०.७२ टक्के), बाजरीची ८ हेक्टर, मक्याची १ हजार २१८ पैकी ५१३ हेक्टरवर (४२.१० टक्के) पेरणी झाली.

तिळाची ५० पैकी २० हेक्टर(४० टक्के), कारळाची १८ हेक्टर, तर सूर्यफुलाची २ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत यंदा हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या ४ तालुक्यांमध्ये कमी, तर कळमनुरी तालुक्यांमध्ये जास्त क्षेत्रावर पेरणी झाली.

हिंगोली जिल्हा २०२४ खरीप पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हिंगोली ७७१४४ ७६८७७ ९९.६५

कळमनुरी ६९१२१ ७०५९८ १०२.१४

वसमत ६३८७२ ६३६४९ ९९.६५

औंढा नागनाथ ६५०१३ ५७९५५ ८९.१४

सेनगाव ८५९०२ ८५४०६ ९९.४२

तुलनात्मक पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक २०२३ २०२४

सोयाबीन २७७८४४ २८०७२९

कपाशी ३१३४७ ३०३८४

तूर ३४२६६ ३०९९७

मूग ५७०१ ५२९३

उडीद ४५१० ३९०५

ज्वारी ३२६७ २२४२

बाजरी १९ ८

मका ४५९ ५१३

तीळ ७२ २०

कारळ ३० १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंपांचा ५० हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT