Soybean Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करा

Kharif Sesson Sowing : खरीप हंगामामध्ये सोयाबिन पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबिन बियाणे खरेदी करताना उगवण क्षमता लक्षात घेऊनच बियाण्यांची खरेदी करावी.

Team Agrowon

Nagpur Soybean News : खरीप हंगामामध्ये सोयाबिन पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबिन बियाणे खरेदी करताना उगवण क्षमता लक्षात घेऊनच बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन कृषीविभागातर्फे करण्यात आले आहे.

पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी चाळणी करावी. कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात. यामुळे कागदांची जाडी वाढेल. नंतर तो कागद पाण्याने ओला करावा व प्रत्येकी १० बिया घेऊन उगवण क्षमता तपासावी.

अशा रीतीने १०० बियांच्या १० गुंडाळ्या पॉलिथिन पिशवी चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसांनंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजाकंकृत झालेल्या बिया मोजाव्यात.

जर अंकुरीत झालेल्या बियांची संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के समजावे. असे आवाहन करण्यात आले आहे. बियाण्यांची पेरणी ३ ते ४ से.मी. खोली पर्यंत करावी.

पेरणीपूर्वी प्रति हेक्टर दर ७० किलो वरुण ५० ते ५५ किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकन पद्धतीने किंवा प्लॉन्टरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पध्दत (बी बी एफ) यंत्रानेसुद्धा पेरणी करावी.

बियाणे विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करताना पावती घेणे आवश्यक आहे. पावतीवर बियाणे उत्पादक कंपनीचे पूर्ण नाव, वाण, लॉट क्र. तपशील आवश्यक आहे.

बियाणे पिशवी व लेबल, खरेदी पावती, पीक काढणी होईपर्यंत जपून ठेवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT