Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop : सोयाबीनची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी

Soybean Germination : अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा थोडे किफायती आणि हातात पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीनची लागवड वाढली.

Team Agrowon

Akola News : ‘‘खरीप हंगामात घरच्या सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी उगवणशक्ती तपासूनच निर्णय घ्यावा,’’ असा सल्ला आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी दिला.

जिल्ह्यात या हंगामात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ‘कृषी वसंत’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अकोला तालुक्यातील मौजे कापशी (तलाव) येथे शेतकरी सभा घेत पीक उगवण व व्यवस्थापनाबाबत डॉ. इंगळे व इतरांनी मार्गदर्शन केले.

अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा थोडे किफायती आणि हातात पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीनची लागवड वाढली. मात्र, खत आणि बियाण्यांचे वाढते भाव पाहता काळजीपूर्वक व्यवस्‍थापन आवश्‍यक आहे.

शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन त्याची उगवण झाली नाही तर होणारा तोटा हा मोठा असतो. हे नुकसान भरून निघत नाही. ती जाणीव ठेवत शास्त्रशुद्ध बियाणे घरच्या घरीच तयार करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या वतीने गावपातळीवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.

मृग नक्षत्र काही दिवसावर येऊन ठेपले असून सोयाबीन बियाण्याची घरच्या घरी उगवण चाचणी कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना गावोगावी बैठकीचे आयोजन करून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.

तालुका कृषी अधिकारी व आत्मा यांच्या वतीने मौजे कापशी (तलाव) येथे खरीप पूर्व शेतकरी सभा झाली. या वेळी मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांची उपस्थिती होती.

डॉ. इंगळे यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे, नैसर्गिक शेती, आत्मा योजना, शेतीपूरक प्रक्रिया उद्योग, स्मार्ट योजना, शेतीमध्ये रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर, माती परीक्षण, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क याविषयी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. इंगळे यांच्याहस्ते सेंद्रिय गटामधील शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करण्यासाठी प्लास्टिक ड्रमचे वितरण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT