Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : नांदेड जिल्ह्यात रब्बीची तीन लाख हेक्टरवर पेरणी

Rabi Season 2024 : मागील पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात आजपर्यंत रब्बीमध्ये तीन लाख १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : मागील पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात आजपर्यंत रब्बीमध्ये तीन लाख १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक दोन लाख २५ हजार हेक्टरवर हरभरा पेरला आहे. रब्बीतील यंदाची पेरणी सरासरी क्षेत्राच्या १३८ टक्के झाली आहे. सध्या जिल्ह्यात गहू, ज्वारीची पेरणी सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा १०२ टक्के पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पासह कोल्हापुरी बंधारे, उच्च पातळी बंधाऱ्यांत शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. परिणामी जमिनीतील जलस्रोत बळकट झाल्याने रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले होते.

यात बियाणे तसेच खताच्या उपलब्धतेबद्दल नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या होत्या. जिल्ह्यात रब्बीचे दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात रब्बीची पेरणीही १३८ टक्क्यानुसार तीन लाख दहा हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यात सर्वाधीक एक लाख ५३ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र आहे.

या तुलनेत हरभरा दोन लाख २५ हजार १६७ हेक्टरवर पेरला आहे. यासोबतच गव्हाचे पेरणीक्षेत्र २९ हजार ७१३ हेक्टर असताना आतापर्यंत ३५ हजार २०१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे पेरणीक्षेत्र ३२ हजार ६९९ हेक्टर आहे. सध्या रब्बीत ज्वारीची पेरणी ३२ हजार ४३६ हेक्टरवर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT