Rabi Season agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : सांगली जिल्ह्यात रब्बीचा एक लाख हेक्टरवर पेरा

Rabi Sowing : नोव्हेंबरच्या मध्यावर १ लाख १६ हजार ६३४ हेक्टर म्हणजे ६१ टक्क्यांवर पेरा झाला आहे. ज्वारीचा सर्वाधिक पेरा झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी मध्यावर आली असून पिकांच्या पेरणीला गती आली आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर १ लाख १६ हजार ६३४ हेक्टर म्हणजे ६१ टक्क्यांवर पेरा झाला आहे. ज्वारीचा सर्वाधिक पेरा झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे. सप्टेंबरपर्यंत पाऊस झाला. तसेच परतीच्या, मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुन्हा काढणी पुढे गेली. यामुळे रब्बी हंगामाची पेरणी पंधरा ते वीस दिवस लांबणीवर पडली. जत तालुक्यात ज्वारीची आघाप पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून रब्बी पेरणीला गती आली असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६६ हजार २९९ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यानंतर वाफसा आल्याने पेरणीची लगबग सुरू झाली.

जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ लाख २६ हजार ६६ हेक्टर असून ९४ हजार ४५० हेक्टरवर पेरा झाला आहे. आगाप पेरणी झालेली ज्वारीची उगवण चांगली झाली आहे. तर गहू, मका, हरभरा या पिकांची पेरणी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस पडला. मध्यम आणि लघू प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा असल्याने रब्बीसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. रब्बीचा पेरा मध्यावर आला आहे. हंगामात सरासरीपेक्षा अधिक पेरणी होईल, अशी शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

तालुकानिहाय रब्बी पेरणी क्षेत्र दृष्टिक्षेप (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज १०,४११

जत ६४,२९१

खानापूर १,९७५

वाळवा २,५१७

तासगाव १,४३१

शिराळा २,४६९

आटपाडी ११,७५५

कवठेमहांकाळ १६,६९३

पलूस ३८९

कडेगाव ४,७०२

एकूण १ लाख १६ हजार ६३४

यंदा पावसामुळे खरीप काढणी आणि रब्बी पेरणी लांबणीवर पडली. गेल्या आठवड्यापासून गतीने पेरणी सुरू झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पेरणी होईल.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT