Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीत साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

Rabi Crop : यंदा रब्बीत ज्वारीचे क्षेत्र कमी होण्याची व गहु, हरभरा, मक्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा रब्बीत ४ लाख ५३ हजार ७६७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने खते, बियाणे व अन्य निविष्ठांचे नियोजन सुरु केले आहे. यंदा रब्बीत ज्वारीचे क्षेत्र कमी होण्याची व गहु, हरभरा, मक्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

नगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ५८ हजार ६३६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्यावर्षी ४ लाख ४९ हजार १६२ हेक्टरवर रब्बीत पेरणी झाली होती. त्याचाच अंदाज गृहीत धरुन यंदा ४ लाख ५३ हजार ८६७ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने यंदा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास साडेचार हजार हेक्टर क्षेत्र वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने खते, बियाणे व अन्य निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत नियोजन केले आहे.

यंदा गेल्यावर्षीपेक्षा ज्वारीचे क्षेत्र कमी राहील तर मका, हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज मांडला आहे. असे असले तरी गेल्यावर्षीपेक्षा यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे यंदा रब्बीत पेरणी क्षेत्र वाढू शकते.

नगर जिल्ह्यात एखादा अपवाद वगळता सर्व धरणे भरली आहेत. पाण्याचा स्रोत चांगला उपलब्ध असू शकतो. शिवाय परतीचा पाऊस अजून सुरु व्हायचा आहे. परतीचा पाऊस अधिक जोरात झाला तर उन्हाळ्यातही चांगल्यापैकी स्रोत उपलब्ध असू शकतात. त्याचा परिणाम पेरणीक्षेत्र वाढीला होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

रब्बीसाठी प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)

रब्बी ज्वारी १,९०,०००

गहु १,२२,०००

मका ४२,५००

इतर तृणधान्ये ६०

हरभरा ९८,५००

इतर कडधान्ये ५४५

करडई १४०

तीळ ४२

सूर्यफूल २५

इतर गळीतधान्य ३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT