Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बी हंगामात पेरणीने ओलांडली सरासरी

Rabi Season 2024 : रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या असून जिल्ह्याने यंदा सरासरी क्षेत्र ओलांडले आहे.

Team Agrowon

Akola News : रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या असून जिल्ह्याने यंदा सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. आतापर्यंत एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.

तर गव्हाने आतापर्यंत २० हजार हेक्टरचा टप्पा ओलांडला असून, अद्याप गव्हाची लागवड सुरू असल्याने हे क्षेत्र वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात एक लाख २१ हजार १०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.

मागील काही वर्षांत परतीचा पाऊस व प्रकल्पातील साठ्यामुळे ही रब्बी लागवडीची सरासरी दरवर्षी ओलांडली जात आहे. यंदा हरभऱ्याची एक लाख १ हजार ४८० हेक्टरवर लागवड आटोपलेली आहे.

हरभऱ्याचे एक लाख ३१० हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १९२४० हेक्टर असून, आजवर २२ हजार ९० हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली. जिल्ह्यात या वर्षात रब्बी ज्वारी सुद्धा हजार हेक्टरपर्यंत लागवड पोचली आहे. मक्याची लागवड दोनशे हेक्टरपर्यंत झाली आहे. याशिवाय करडईची १५ हेक्टरवर पेरणी झाली.

कांदा लागवड चार हजार हेक्टरपर्यंत

जिल्ह्यात यंदा कांद्याच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा जोर दिसून आला आहे. आतापर्यंत ३८७३ हेक्टरपर्यंत पेरणी झाली. कांद्याची लागवड सध्या सुरू आहे. शिवाय कांदा बीजोत्पादनही जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर घेतले जात आहे. याची सुद्धा या आकडेवारीमध्ये भर पडणार आहे.

गव्हाची लागवड वाढती

खरिपातील पीक काढून शेतकरी गव्हाची लागवड करतात. यंदा प्रकल्पातून पाण्याची आवर्तने मिळू लागली आहेत. त्यामुळे जसजसे शेत रिकामे होत आहे, तशी लागवड केली जात आहे. या भागात शेतकरी अद्यापही गव्हाची पेरणी करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे गव्हाचे लागवड क्षेत्र बरेच वाढण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT