Agriculture Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : नांदेडमध्ये सरासरीच्या पुढे पेरणी

Sowing Update : लातुर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी नांदेडमध्ये सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Latur News : लातुर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी नांदेडमध्ये सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. इतर जिल्ह्यात मात्र अपेक्षित पेरणी होऊ शकली नाही. धाराशीव जिल्ह्यात सर्वांत कमी क्षेत्रावर उन्हाळी पेरणी झाली आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात ५३ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ७४ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली.

नांदेड जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १२२ टक्के, त्या पाठोपाठ लातूर जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ७७ टक्के, परभणीमध्ये ६२ टक्के, हिंगोलीमध्ये ५६ टक्के तर धाराशीमध्ये सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सर्वात कमी केवळ २४ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

भुईमूग, मका दाणे भरण्याच्या अवस्थेत

यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत भुईमुगाचे सरासरी क्षेत्र २६३८८ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात २५ हजार ३५० हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ९६ टक्के क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली. पेरणी झालेले भुईमुगाचे पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. दुसरीकडे उन्हाळी मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ८०५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७४०८ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१ टक्के इतकी आहे. पेरणी झालेला मका पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्हानिहाय उन्हाळी सरासरी व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी

लातूर २३९६ १८४८

धाराशिव ९५५५ २३०९

नांदेड २२४४१ २७५४४

परभणी १०९५८ ६८८९

हिंगोली २६३४८ १४८५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT