Jowar Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : सांगोल्यात २१ हजार ४८५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी

Rabi Sowing : सांगोला तालुक्यात रब्बी हंगामात ३९ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर ८८.४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Team Agrowon

Solapur News : सांगोला तालुक्यात रब्बी हंगामात ३९ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर ८८.४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात २१ हजार ४८५ हेक्टरवर ५७.३३ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे.

रब्बी पिकाच्या पेरणीत ज्वारीच्या पेरण्या ५० टक्क्यांवर झाल्या आहेत. गहू व हरभरा पिकांच्या पेरणी क्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.

सांगोला तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप व रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये वाढ झाली आहे. विहीरी व विंधन विहिरींना सध्या समाधानकारक पाणी आहे. उपलब्ध पाण्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे.

सांगोला तालुक्यात २१ हजार ४८५ हेक्टर (५७.३३ टक्के) क्षेत्रावर रब्बी ज्वारी, २ हजार ३५१ हेक्टर (२८६ टक्के) क्षेत्रावर गहू, १३ हजार ३२१ हेक्टर (२५८ टक्के) क्षेत्रावर मका, २ हजार ०२६ हेक्टर क्षेत्रावर (२६३ टक्के) हरभरा, इतर कडधान्य ३९ हेक्टर, जवस २४ हेक्टर, भुईमूग ६३ हेक्टर, करडई ३२ हेक्टर अशा ३९ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तसेच मका १ हजार ८२४ हेक्टर, ज्वारी १ हजार २८० हेक्टर अशी ३ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेतली आहेत.

कांदा ४४ हेक्टर, ३८ हेक्टर टोमॅटो, मिरची ११७ हेक्टर, वांगी ७७ हेक्टर, भेंडी ४ हेक्टर, दोडका ९ हेक्टर, घेवडा १ हेक्टर, कारले १० हेक्टर, शेवगा ४६ हेक्टर अशी ३४६ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिके घेतली आहेत.

यंदाच्या हंगामात आंबा ६४ हेक्टर, डाळिंब १३३ हेक्टर, अंजीर ५ हेक्टर, लिंबू १ हेक्टर, पेरू ५५ हेक्टर, सीताफळ १३ हेक्टर, बोर २३ हेक्टर, केळी १७८ हेक्टर, पपई १ हेक्टर, कलिंगड १८ हेक्टर, खरबूज ३१ हेक्टर, ड्रॅगन फ्रूट ३ हेक्टर अशी ५२५ हेक्टर क्षेत्रावर नव्याने फळबाग लागवड करण्यात आली आहे.

तालुक्यात ६४६ हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस, ५४६ हेक्टर क्षेत्रावर पूर्व हंगामी ऊस, १९ हेक्टर क्षेत्रावर खोडवा ऊस अशी १२०४ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने यंदा रब्बी हंगामातील पिके हाती लागतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

तालुक्यात रब्बी हंगामात ३९ हजार ३४१ हेक्टर क्षेत्रावर ८८.४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. आत्तापर्यंत २ हजार ३५१ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची पेरणी झाली असली तरी गहू व हरभरा पिकाची अजूनही पेरणी सुरू असून, या पिकांची पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. पाऊस चांगला झाल्याने पाण्याची कमतरता कमी पडणार नाही अशी तालुक्यात परिस्थिती आहे.- दीपाली जाधव, तालुका कृषी आधिक्य, सांगोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT