Sonhira Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Sonhira Sugar Factory : उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा 'सोनहिरा' कायम ठेवणार : मोहन कदम

Sonhira Sugar Factory : सोनहिरा साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या २४ व्या गळीत हंगामाची सांगता व साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी अध्यक्ष कदम बोलत होते.

sandeep Shirguppe

Sangli Sonhira Sugar Factory : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने सातत्याने उसाला उच्चांकी दर दिला. यापुढेही उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम राखली जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष, माजी आमदार मोहन कदम यांनी दिली.

सोनहिरा साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या २४ व्या गळीत हंगामाची सांगता व साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी अध्यक्ष कदम बोलत होते. संचालक रघुनाथराव कदम, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, "संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव, पलूस व खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सोनहिरा कारखान्याची स्थापना केली. पारदर्शक कारभार व उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम राखत 'सोनहिरा'ने देशातील एक सर्वोत्कृष्ट कारखाना असा लौकिक मिळवला आहे. सभासद, शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडला."

कार्यकारी संचालक शरद कदम यांनी हंगामाचा आढावा घेतला. ऊसतोडणी, वाहतूक कंत्राटदार, बैलगाडी कंत्राटदार, हार्वेस्टिंग यंत्र मालकांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संचालक पंढरीनाथ घाडगे, बापूसाहेब पाटील, युवराज कदम, दिलीपराव सूर्यवंशी, सयाजी धनवडे, डी. के. कदम, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, संभाजीराव जगताप, शिवाजी काळेबाग यांच्यासह सभासद, खातेप्रमुख व कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेती अधिकारी प्रशांत कणसे यांनी आभार मानले.

१० लाख ५९ हजार ७८० टन गाळप

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ या २४ व्या गळीत हंगामात १४८ दिवस १० लाख ५९ हजार ७८० टन उसाचे गाळप झाले. ११ लाख ८२ हजार ३०९ साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान

Agricultural Export Opportunities: शेतकऱ्यांना निर्यात संधी उपलब्ध करून देणार: पणनमंत्री रावल

Gokul Election Voting: 'गोकुळ'साठी आज ३५ केंद्रांवर मतदान, चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार?

Soybean Arrival: बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली

Land Acquisition Rule: भूसंपादन नसल्यास टेंडरही नाही

SCROLL FOR NEXT