Fertilizers to be applied through Drip Irrigation : ठिबक सिंचनातून द्यावयाची खते निवडण्यासाठी आणि कार्यक्षम वापरासाठी महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते.
खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्तीत जास्त असावे.
शेतीतील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत.
खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.
खतातील क्षारांमुळे गाळण यंत्रणा, ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नये तसेच संचातील कोणत्याही घटकावर गंज चढू नये अथवा अनिष्ट परिणाम होऊ नये.
खते शेतातील वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत.
खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये.
एका वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्रित देताना त्यांची आपापसांत कोणतीही अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत.
खोडवा ऊस जास्त कालावधीचे असून त्याची उत्पादन देण्याची क्षमता प्रचंड असल्याने त्यांची अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. १२ महिन्यांचे खोडवा ऊस पीक साधारणपणे १ टन ऊस निर्माण करण्यासाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेते. म्हणजेच हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १५० किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करणे जरुरीचे आहे.
ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती:
ठिबक सिंचनाद्वारे प्रमाणबद्ध, मात्राबद्ध पद्धतीने खते देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खतांची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकसारखी राहते. खत मात्रा आणि पाण्याचा प्रवाह सतत सारखा राहतो. ठिबक सिंचनातून खते देण्यासाठी फर्टिलायझर टाकी किंवा व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर इंजेक्शन पंप या उपकरणांचा वापर केला जातो.
खोडवा उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन मार्गदर्शक तक्ता
खोडवा ठेवण्याचा कालावधी : नोव्हेंबर ते फेब्रुवारी
शिफारशीत खत मात्रा:१०० किलो नत्र: ४६ किलो स्फुरद: ४६ किलो पालाश (प्रति एकर)
खोडवा ठेवताना शेणखत गंधक फेरस सल्फेट झिंक सल्फेट मँगेनीज सल्फेट निंबोळी पेंड बोरॉन
१० टन २४ किलो १० किलो ८ किलो १० किलो १०० किलो २ किलो
खोडवा ठेवल्यानंतर खत नियोजन
खते देण्याची वेळ नत्र स्फुरद पालाश
% मात्रा युरिया (किलो/ एकर) % मात्रा फॉस्फेरिक आम्ल (किलो/ एकर) % मात्रा म्युरेट ऑफ पोटॅश (किलो /एकर)
खोडवा ठेवल्यानंतर
४५ दिवसांपर्यंत १४ ३०.३८ १४ १०.५० १२ ९.२४
खोडवा ठेवल्यानंतर
४६ ते १३५ दिवसांंपर्यंत ५५ ११९. ३५ ५५ ४१.२५ ४६ ३५.४२
खोडवा ठेवल्यानंतर
१३६ ते १८० दिवसांपर्यंत २४ ५२.०८ २४ १८.०० २७ २०.७९
खोडवा ठेवल्यानंतर
१८१ ते २१० दिवसांपर्यंत ७ १५.१९ ७ ५.२५ १५ ११.५५
एकूण १०० २१७ १०० ७५ १०० ७७
टीप : १. वरील शिफारस ही सर्वसाधारण असून, प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या शेतातील मातीच्या रासायनिक पृथक्करणानुसार खते देणे आवश्यक आहे. २. वरील मात्रा दर दिवशी एक दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा याप्रमाणे देता येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.