Solar Energy Systems Agrowon
ॲग्रो विशेष

Solar System : नाशिक परिमंडळात ५ हजार घरांच्या छतांवर सौर यंत्रणा

Solar Energy System : नाशिक परिमंडळातील २२ हजार ८३९ ग्राहकांचा समावेश असून त्यातील ५ हजार १४८ ग्राहकांनी १८.५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे.

Team Agrowon

Nashik News : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या  नाशिक  परिमंडळात प्रतिसाद मिळत  असून आतापर्यंत महावितरणच्या पोर्टलवर एकूण अर्ज केलेल्या ग्राहकांमध्ये नाशिक परिमंडळातील २२ हजार ८३९ ग्राहकांचा समावेश असून त्यातील ५ हजार १४८ ग्राहकांनी १८.५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे.  या योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या  नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर  यांनी केले.

महिनाभरात ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौरऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३०  हजार रुपये,  दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८  हजार रुपये अनुदान मिळते.

एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे १२०  युनिट वीज तयार होते. छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.

ग्राहकांना  https://www.pmsuryaghar.gov.in/या संकेत  स्थळावर  योजनेची  सर्व  माहिती  उपलब्ध  आहे तसेच  नोंदणी करण्यासाठी पीएम-सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाइल ॲप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. 

मंडळ कार्यालय एकूण अर्ज सोलर बसविलेले ग्राहक

नाशिक मंडळ १०,५६० ३५०३

मालेगाव मंडळ २,५७८ २०५

अहमदनगर मंडळ ९,७०१ १४४०

एकूण २२,८३९ ५,१४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT