Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : शेतीला दिवसा विजेसाठी सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प

Solar Power Project : पश्‍चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्‍वत वीजपुरवठा करण्यासाठी आणखी १०९१ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : पश्‍चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्‍वत वीजपुरवठा करण्यासाठी आणखी १०९१ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १९९१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॉटच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० ची वेगाने अंमलबजावणी सुरू असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील ७१० उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यासाठी ५९१५ मेगावॉट सौर वीजनिर्मितीचे लक्ष्य असून, आतापर्यंत ७६६९ एकर शासकीय जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २७६ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी १९९१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील या २७६ उपकेंद्रांच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा व शाश्‍वत वीजपुरवठा होणार आहे. शेतीच्या सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा मिळावा ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रत्यक्ष साकार होत आहे. त्यामुळे सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांना संबंधित ग्रामपंचायत व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले.

पहिल्या टप्प्याचे काम सुरू

पश्‍चिम महाराष्ट्रात सौरऊर्जा निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात ५४ उपकेंद्रांसाठी ४२९ मेगावॉट, सातारा जिल्ह्यातील ३९ उपकेंद्रांसाठी २०८ मेगावॉट, सांगली ४१ उपकेंद्रांसाठी ३१७ मेगावॉट, कोल्हापूर ४४ उपकेंद्रांसाठी १७० मेगावॉट आणि सोलापूर जिल्ह्यातील ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॉट असे एकूण २७६ उपकेंद्रांसाठी १९९१ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणीचे काम संबंधित एजन्सीजकडून सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Water Supply Quotation: चारा व पाणीपुरवठा दरपत्रक सादरीकरणाला मुदतवाढ; ८ जूनपर्यंत संधी

Cotton Seed Black Market: देशी कापूस बियाणांचा जळगावात काळाबाजार; शेतकऱ्यांची लूट

Urea Fertilizer Supply: अकोला जिल्ह्यात पाच दिवसांत ७,१०१ टन युरिया उपलब्ध होणार; शेतकऱ्यांना दिलासा

Sina River Water Release: सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढ्यात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Maize MSP Procurement: हमीभावाने खरेदी फक्त सात टक्केच

SCROLL FOR NEXT