Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : शेतीतील आव्हानांवर मात करण्यासाठी सौर ऊर्जा, शेती तंत्रज्ञानाचा समन्वय महत्त्वाचा

Solar Power : ॲग्री-पीव्ही प्रकल्पाच्या प्रमुख संशोधक डॉ. गोदावरी पवार यांनी संशोधन कार्याची सविस्तर माहिती दिली.

Team Agrowon

Parbhani News : सौरऊर्जा आणि शेती तंत्रज्ञानाचा समन्वय भविष्यातील शेतीतील आव्हानांवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन (कै.) वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष नीलेश हेलोंडे पाटील यांनी केले.

बुधवारी (ता. १५) नीलेश हेलोंडे पाटील यांनी झरी (ता. मानवत) शिवारात ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प भेट देऊन संशोधन कार्याची माहिती जाणून घेतली.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, स्वावलंबन मिशनचे जनसंपर्क अधिकारी कृष्ण कुमार देठे, डॉ. बी. एम. कलालबंडी उपस्थित होते.

ॲग्री-पीव्ही प्रकल्पाच्या प्रमुख संशोधक डॉ. गोदावरी पवार यांनी संशोधन कार्याची सविस्तर माहिती दिली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत जर्मन एजन्सी जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील करारानुसार ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधनाकरिता मागील दोन वर्षांपासून विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणी यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वाचे संशोधन कार्य चालू आहे.

झरी (ता. मानवत) शिवारात ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत सौरऊर्जा पॅनेलखालील जमीनीवर विविध पिकांची लागवड करून संशोधन केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT