Flight Agrowon
ॲग्रो विशेष

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Solapur Mumbai and Goa Ticket : सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा या हवाई मार्गांसाठी ‘फ्लाय-९१’ या कंपनीने पुढाकार घेतला असून, येत्या २३ डिसेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा या हवाई मार्गांसाठी ‘फ्लाय-९१’ या कंपनीने पुढाकार घेतला असून, येत्या २३ डिसेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी तिकीट दर जाहीर झाले असून, हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये आहेत.

या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहेच. पण सोलापूरचे धार्मिक पर्यटन ते गोव्याचे सागरी पर्यटन अशी दोन स्थळे जोडण्याचा प्रयत्न यातून झाला आहे.

सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त १४८८ रुपयांपासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये पुढे दर वाढत जातात, जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात. तर सोलापूर ते गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) थेट मार्गावर तिकिटाचा प्रारंभिक दर फक्त ६८९ रुपये आहे.

या मार्गावरही स्लॅबनुसार पुढे दर वाढवले जातात. सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर राज्य शासनाच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग आणि ‘रिजनल कनेक्टिव्हिटी योजना’ (आरसीएस) अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गांवर फक्त जीएसटी लागू होतो, ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरणार आहे. या सेवेमुळे सोलापुरातील धार्मिक पर्यटन ते गोव्यातील सागरी पर्यटन अशी दोन केंद्रे जोडली जाणार आहेत.

अशा असतील विमान उड्डाणाच्या वेळा

सोलापूर ते मुंबई हे विमान सोलापुरातून सकाळी ९ वाजून ४० मिनिटाने निघेल, ते सकाळी ११ वाजून २० मिनिटाने मुंबईत पोचेल. तर मुंबईहून सकाळी ११ वाजून ५५ मिनिटाने निघेल, ते सोलापुरात १ वाजून ४५ मिनिटाने पोहोचेल.

सोलापूरहून गोव्यासाठी दुपारी सव्वादोन वाजता विमान निघेल, ते दुपारी साडेतीन वाजता गोव्यात पोहोचेल. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता विमान सोलापूरसाठी निघेल आणि सकाळी ९ वाजून १० मिनिटाने सोलापुरात पोहोचेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT