Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीची निवडणूक जाहीर; २७ एप्रिलला मतदान

APMC Election : सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीची स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नव्या कार्यक्रमानुसार मंगळवारपासून (ता. २५) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर २७ एप्रिलला मतदान आणि २८ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच या आधी बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली होती. पण अवघ्या चारच दिवसांत ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

त्या उर्वरित चार दिवसांचा विचार करून तिथपासून पुढील प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवार (ता.२५) ते शुक्रवार (ता.२८) असे चारच दिवस उमेदवारी दाखलासाठी मिळणार आहेत. या दाखल अर्जाची छाननी १ एप्रिलला होणार आहे. छाननीत वैध ठरलेल्या अर्जातून अर्ज माघारीसाठी २ ते १६ एप्रिल अशी मुदत देण्यात आली आहे.

त्यानंतर १७ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. २७ एप्रिलला मतदान आणि २८ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया घ्यावी, यासाठी बसवराज माळगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने चार आठवड्यात निवडणूक घेण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार ही प्रक्रिया पर पडत आहे.

१८ संचालक निवडले जाणार

सोलापूर बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. सहकारी संस्था गटातील ११ जागांचा त्यात समावेश आहे. ११ जागांपैकी सात जागा सर्वसाधारण गटासाठी, दोन जागा महिलांसाठी, एक जागा इतर मागासवर्गीय, एक जागा विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी असणार आहे. तर ग्रामपंचायत मतदारसंघातून दोन जागा सर्वसाधारण गटासाठी, एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी, एक जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि दोन जागा व्यापारी मतदारसंघ आणि एक जागा हमाल-तोलार मतदारसंघासाठी असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात मका, गहू, तांदूळ, दूध उत्पादकांना दिलासा; वाणिज्यमंत्र्यांनी दिली माहिती

Mumbai Mayor Election: मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे भाजपच्या उमेदवार, उपमहापौरपद शिंदेंच्या सेनेला

Maha Pashudhan Expo 2026: परळीत शुक्रवारपासून महापशुधन एक्स्पो

Post Harvest Management: वाहतुकीतील आर्द्रता, वायू नियंत्रण

Ear Tagging: वंशावळ तपासण्यासाठी इअर टॅगिंगचा आधार कसा घेता येतो?

SCROLL FOR NEXT