Solapur APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एक महिन्यात संपवा

Solapur APMC : सोलापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्या स्टेजवरून स्थगित करण्यात आली होती आणि नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या होत्या.

Team Agrowon

Solapur News : सोलापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्या स्टेजवरून स्थगित करण्यात आली होती आणि नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या होत्या.

पण त्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलावर निकाल देताना एका महिन्यात आहे, त्या स्थितीवरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ३१ डिसेंबर २०२४ नवा अध्यादेश काढून सूचना केल्या आहेत.

त्यामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी १.०६.२०२४ अखेरच्या दिनांकास ग्राह्य धरून केलेली असल्याने, सदर मतदार यादीस २.१२.२०२४ रोजी सहा महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची १ जानेवारी २०२५ पासून आहे,

त्या टप्यावर सुरू होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करून नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करून सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा असे सूचित करण्यात आले होते.

दरम्यान, या स्थगिती आदेशाच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक बसवराज माळगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बसवराज बगले यांच्यासह इतर उच्च न्यायालयात गेले. त्यावर उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

बाजार समितीचे ५४२१ मतदार

बाजार समितीचे एकूण मतदार ५४२१ असून, त्यामध्ये व्यापारी मतदार संघात १२७६, हमाल, तोलार मतदार संघात १०८४, ग्रामपंचायत मतदार संघात ११७६ आणि विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात १८९५ मतदारांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT