Solapur Doodh Sangh Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Doodh Sangh : सोलापूर जिल्हा दूध संघप्रकरणी आता ५ फेब्रुवारीला सुनावणी

Cooperative Dairy : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस पुण्याचे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिली होती.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस पुण्याचे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिली होती.

या नोटिशीवरील सुनावणी बुधवारी (ता. २२) पाटील यांच्याकडे झाली; परंतु या प्रकरणात आम्हाला आणखी वाढीव कागदपत्र हवीत, त्यासाठी मुदतवाढ हवी, अशी मागणी संचालकांनी केली. त्यानुसार आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार आहे.

सोलापूर जिल्हा दूध संघाला गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेला तोटा, संचालक मंडळाचे दूध संघाच्या कारभाराकडे असलेले दुर्लक्ष, यासंदर्भाने अनेक तक्रारी विभागीय दुग्ध उपनिबंधकांकडे गेल्या होत्या.

त्यावर उपनिबंधकांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीबाबत नोटीस बजावली होती. त्यावर ही सुनावणी झाली. जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुजित पाटील, जिल्हा दूध संघाचे वकील व जिल्हा दूध संघाचे संचालकांचे वकील अॅड. जन्मेजय कुर्जेकर उपस्थित होते.

संचालकांच्या वतीने अॅड. कुर्जेकर यांनी बाजू मांडली. या नोटिशीवर म्हणणे सादर करण्यासाठी पुरेशी कागदपत्र उपलब्ध नाहीत, कागदपत्रे मिळाल्यानंतर म्हणणे सादर करण्यासाठी वेळही मिळावा, अशी मागणी करण्यात आली. त्यांच्या मागणीवरून दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी या प्रकरणाची सुनावणी आता ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा आणि याचदिवशी सुनावणीचा निर्णय दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT