APMC Election  Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Election : सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Election Update : पाऊस आणि शेतकऱ्याची सुरु असलेली कामे, याची कारणे देत या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणुकीसाठी मतदार याद्या अंतिम झाल्या आहेत. पण आता पाऊस आणि शेतकऱ्याची सुरु असलेली कामे, याची कारणे देत या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत मागच्या माहिन्यात (जुलैमध्ये) संपली आहे. त्यापैकी सोलापूर बाजार समितीवर सहा सदस्यीय प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्य प्रशासक म्हणून पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर अन्य सहा अशासकीय सदस्यांपैकी मनिष काळजे आणि अमोल शिंदे या शिवसेनेच्या दोन जिल्हाध्यक्षांना त्यात संधी देण्यात आली आहे. आता उर्वरित तीन सदस्य भाजपचे आणि एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा याप्रमाणे सहा जणांची निवड होणार आहे. पण ही निवड रखडली आहे, तर बार्शी बाजार समितीसाठी सात सदस्यांची निवड निश्चित करण्यात आली आहे.

पण त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. या दोन्ही बाजार समितीवर अनुक्रमे सोलापूरवर माजी पालकमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख आणि बार्शी बाजार समिती भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील सदस्यांच्या निवडी होत आहेत,

पण तांत्रिक कारणामुळे या निवडी रखडल्या आहेत. पण दुसरीकडे प्रशासनाकडून निवडणुकीचीही जोरदार तयारी सुरू असून, गेल्याच आठवड्यात मतदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे, त्यामुळे लवकरच निवडणूक होणार असल्याची शक्यता होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे त्याचा कार्यक्रम दिला आहे, पण आता पाऊस आणि शेतीची सुरू असलेली कामे विचारात घेऊन निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT