Soil Test AI Technology agrowon
ॲग्रो विशेष

Soil Test AI Technology : माती परिक्षण आता एआय तंत्रज्ञानावर, अभियांत्रीकी विद्यार्थ्यांकडून सॉफ्टवेअरची निर्मीती

sandeep Shirguppe

Soil Testing : अर्टिफिशियल इंटेलीजन्सचा वापर करून नवीन गोष्टींचा शोध लावणे सोपे बनले आहे. सध्या एआय तंत्रज्ञानाचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील डीकेटीईच्या काही विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापरातून ‘मातीचे परीक्षण करून त्यातील घटक ओळखता येतील’ यावर आधारित शेतकऱ्यांना उपयुक्त असे सॉफ्टवेअर बनवले आहे.

इचलकरंजी येथील डीकेटीईच्या अर्टिफिशियल इंटेलीजन्स इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी मृणाली कांदेकर, प्रतीक खंदारे, अथर्व अंकलखोपे आणि योगेश कल्याणी यांनी या सॉफ्टवेअरची निर्मीती केली आहे. यामध्ये प्रा. सौ. डी. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.

सॉफटवेअरमुळे मातीतील पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन यांचे प्रमाण किती आहे, हे ओळखून मातीचा पीएच चेक करता येतो. त्यामुळे कोणकोणती विविध उत्पादने घेता येतील, याचा अंदाज बांधण्यास शेतकऱ्यांना मदत होऊन योग्य तो निर्णय घेणे सोपे होते. मातीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करता येतो.

मातीतील घटकांची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्या-त्या घटकाला उपयुक्त अशी पिके घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार असून, त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होईल असे या विद्यार्थ्यांचे मत आहे.

संस्थेच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी प्रोजेक्ट निवडताना प्राधान्याने लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यावर तंत्रज्ञानाच्या सहायाने समाधानकारक उपाययोजना तयार करण्याचा प्रयत्न करतात, असे मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी सांगितले. संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. त्यांना संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. के. शिरगावे यांचे मार्गदर्शन लाभले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT