Orange Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Test : संत्राबागेपूर्वी माती परीक्षण गरजेचे

Orange Farming : संत्राबाग लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर लागवड करू नये.

Team Agrowon

Ahilyanagar News : संत्राबाग लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर लागवड करू नये. नर्सरीतून रोपे आणताना एक ते दीड फूट उंचीचे कलमे आणावीत. लागवडीनंतर दर वर्षी संत्राबागेचा शेंडा खुडावा. त्यामुळे उंची न वाढता झाडे डेरेदार होईल, असे प्रतिपादन निवृत्त कृषी पर्यवेक्षक जनार्दन तुपे यांनी केले.

सारोळा कासार (जि.अहिल्यानगर) येथे ‘सकाळ-अॅग्रोवन’ व ‘रिवुलिस इरिगेशन इं.प्रा.लि.’च्या संयुक्त विद्यमाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘संत्रा बागेची लागवड व बहार व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, सतीश आकडे, विक्री अधिकारी अमोल काजळे, ‘आम्ही शेतकरी अॅग्रो सर्व्हिसेस’चे संचालक केतन आठरे, नानासाहेब सूर्यवंशी, राजाराम धामणे, नानासाहेब कडूस, शिवाजी लिंभोरे, पोपट काळे, दगडू कडूस, संजय पाटील आदींसह सारोळा कासार परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुपे म्हणाले, की संत्राबाग लागवड करताना बुरशीनाशकांची ड्रेंचिंग करावे, जेणेकरून फायटोफ्थोरा या रोगाचा प्रार्दुभाव होणार नाही. लागवडीनंतर कमी उंचीचे अंतरपीक घेण्यात यावे. झाडाचे वय चार वर्षे झाल्यानंतर बहार धरावा. बहार व्यवस्थापनामध्ये जमिनीचा पोत पाहून ताण द्यावा.

ताणाच्या काळामध्ये वाळलेल्या फांद्या कट कराव्यात व बुरशीनाशकांची फवारणी करावी. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक किड नियंत्रणाचा वापर करावा. एकात्मिक किड नियंत्रण करताना गुळवेल, वासनवेल बागेभोवती असलेतर काढून टाकावी.

रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे यांनी पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन याची माहिती दिली. तसेच स्पेन येथून आयात करण्यात आलेल्या संत्र्याच्या नवीन वाण टँगो लागवडीविषयी माहिती देत मातीचा प्रकार व आराखड्यानुसार ठिबकची निवड करावी.

ठिबकच्या वापरामुळे वापसा नियमित टिकून असतो, असे सांगून कंपनीची विविध उत्पादने व कंपनी सेवाबद्दल माहिती दिली. सतिश आकडे यांनी आम्ल प्रक्रियेची माहिती दिली. सूत्रसंचालन ‘अॅग्रोवन’चे सिनीयर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख यांनी केले. आभार जयप्रकाश पाटील यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT