Soil Health Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : मृद्‍ आरोग्यासाठी उच्च दर्जाचे संशोधन हवे

Soil Management : विविध कारणांनी खालावलेली मातीच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी मृद्‍ शास्त्रज्ञांना उच्च दर्जाच्या संशोधनासाठी दिशा निश्‍चित करावी लागेल.

Team Agrowon

Parbhani News : विविध कारणांनी खालावलेली मातीच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी मृद्‍ शास्त्रज्ञांना उच्च दर्जाच्या संशोधनासाठी दिशा निश्‍चित करावी लागेल. संशोधनात डिजिटल साधनांचा वापर करावा लागेल त्यासोबतच मातीच्या आरोग्य वर्धनासाठी जमिनीतील जैवविविधता वाढविणे, सेंद्रिय कर्बाची वृद्धी करणे या बाबींवर लक्ष केंद्रित करून सर्व घटकांनी एकात्मिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हैदराबाद येथील ‘इक्रिसॅट’चे जागतिक संशोधन कार्यक्रम संचालक डॉ. एम. एल. जाट यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये भारतीय मृद्‍ विज्ञान संस्थेच्या परभणी शाखेतर्फे अन्न सुरक्षा आणि कृषी शाश्‍वततेसाठी मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करणे या विषयावर मृद्‍ शास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादामध्ये गुरुवारी (ता. २१) दुपारी कृषीच्या पुनरुज्जीवितातून मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करणे यावरील डॉ. जाट यांचे तर ‘मृदा आरोग्य वर्धन आव्हाने व संधी’ या विषयावर कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्‍य डॉ. बी. एस. द्विवेदी यांचे बीज भाषण झाले.

या सत्राच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्‍ली येथील नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन संस्‍थेचे उपमहानिर्देशक डॉ. एस. के चौधरी होते. सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद ईस्माइल, डॉ. एन. एम. कोंडे आदी मंचावर उपस्थित होते.

डॉ. जाट म्हणाले, की मृद्‍ आरोग्य वर्धित करण्यासाठी अन्नद्रव्ये, पाणी तसेच इतर निविष्ठांचे सुसंस्कृतपणे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा. वातावरणातील बदलांशी कृषी क्षेत्र खूप निगडित आहे. हरितगृह वायू उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढले आहे. मातीच्या आरोग्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल आवश्यक असून, त्यासाठी जागृतीची गरज आहे.

डॉ. द्विवेदी म्हणाले, की विविध कारणांनी अकृषिक जमिनीचे क्षेत्र वाढत आहेत. औद्योगिकीकरणामुळे माती प्रदूषित होत आहे. खतांचा असंतुलित वापर व सेंद्रिय घटकांचा नगण वापर यामुळे उत्पादकतेवर परिणाम होत आहे. मातीच्या आरोग्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागेल.

पीक पद्धतीत कडधान्याचा समावेश करावा. पिकांचे अवशेषाचा कार्यक्षम वापरासाठी तंत्रज्ञान व धोरणांचा आधार हवा. गावपातळीवर सामुदायिकरीत्या सेंद्रिय व निविष्ठा निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. डॉ. चौधरी म्हणाले, की मातीचे सुसंस्कृत नियोजन करून निसर्ग अनुकूल शेती करावी लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT