Soil Health Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे

Latest Agriculture News : बीटी कापसावर सेंद्रिय बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी पीबीनॉट धागा या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक वखारी गावात घेण्यात आले आहे. पीबीनॉट धागा या तंत्रज्ञाना संदर्भात कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी यांनी मार्गदर्शन केले.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalna News : सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीचे आरोग्य चांगले ठेवल्यास पिकाचे शाश्वत उत्पादन मिळू शकते, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. विश्व कापूस दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कापसे बोलत होते.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी व साउथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. ६) रोजी वाखारी (ता. जालना) येथील प्रयोगशील शेतकरी निवृत्ती रंगनाथ घुले यांच्या कपाशी शेतावर जागतिक कापूस दिनानिम्मीताने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, कीटक शास्त्रज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी, मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी, वखारी येथील सरपंच काकासाहेब घुले, नाव्हा येथील रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक संतोष शिंदे आदी उपस्थितीत होते.

डॉ. एस. व्ही. सोनुने म्हणाले, की जालना जिल्ह्यातील कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कृषी विज्ञान केंद्र सुरुवातीपासून कापूस पिकावर काम करत आहे. कापूस पिकातील बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विज्ञान केंद्राने एकात्मिक कीड व्यवस्थापनावर काम केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले असल्याचे ते म्हणाले.

बीटी कापसावर सेंद्रिय बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी पीबीनॉट धागा या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक वखारी गावात घेण्यात आले आहे. पीबीनॉट धागा या तंत्रज्ञाना संदर्भात कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. प्रा. राहुल चौधरी यांनी अन्नद्रव्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामप्रसाद खैरे यांनी केले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT