Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

Purchase off with Fertilizer Linking : ‘नाडा’च्या दणक्यानंतर कंपन्यांची लिंकिंगबाबत नरमाईची भूमिका

The Role of the Fertilizer Company : नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशन(नाडा)ने बैठक घेत जिल्ह्यात कुठेही रासायनिक खते लिंकिंगसह खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Team Agrowon

Nashik News : रासायनिक खते विक्रीत लिकिंग होत असल्याने विक्रेत्यांना कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत होता. या मुद्द्यावर नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशन(नाडा)ने बैठक घेत जिल्ह्यात कुठेही रासायनिक खते लिंकिंगसह खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अखेर यासंबंधी कंपन्यांनी लिंकिंगसह खतांच्या खरेदीमध्ये नरमाईची भूमिका घेतली आहे. रासायनिक खते विक्रीत लिंकिंग करणार नाही, अशी कंपन्यांनी ग्वाही दिल्याचे ‘नाडा’कडून कळवण्यात आले आहे

खरेदी बंदच्या भूमिकेनंतर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात ‘कृषी’चे प्रमुख अधिकारी, खते विक्रेते, ‘नाडा’चे पदाधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले, ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, मोहीम अधिकारी अभिजित जमदाडे, जगन सूर्यवंशी यांच्या उपस्थित बैठक झाली. या वेळी ‘नाडा’चे अरुण मुळाणे, मंगेश तांबट, चंद्रकांत ठक्कर, शिवाजी पाटील, पुंडलिक जाधव, दीपक सानप, संतोष पाटील, दीपक मालपुरे, महेंद्र सराफ आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT