Agriculture AI  Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Agriculture : ‘एआय’आधारित शेती हेच कृषीचे भविष्य

AI Farming : . येत्या काळात जैवतंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देवून कृषी क्षेत्रात हवामान बदलाचे विपरीत परिणाम कमी करता येतील, असा विश्वास परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Latur News : जैवतंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित शेती हे कृषी क्षेत्राचे भविष्य आहे. येत्या काळात जैवतंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देवून कृषी क्षेत्रात हवामान बदलाचे विपरीत परिणाम कमी करता येतील, असा विश्वास परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाच्या वतीने येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ‘कृषि शिक्षण आणि संशोधनातील सध्याचा कल आणि संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत तो बोलत होते. महाविद्यालयातील विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. विलास भाले, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक विस्तार डॉ. राकेश अहिरे, माजी कुलसचिव डॉ. दिगंबर चव्हाण व अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची प्रमुख या वेळी उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की हवामान बदलाच्या परिस्थितीतही अन्नसुरक्षेकरिता व शाश्वत कृषी विकासासाठी जैवतंत्रज्ञान आधारित कीड रोग प्रतिबंधक, जनुकीय सुधारित ताण सहन करणारे वाण, लवकर परिपक्व होणारे व कोणत्याही तापमानास तग धरणारे पिकांचे वाण, अजैविक ताण प्रतिबंधक पीक वाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढ शक्य होईल.

डॉ. गडाख यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जैवतंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध पर्यायाबाबत मार्गदर्शन केले. जैवतंत्रज्ञान व्यवसायातील संधी व रोजगार, कंपन्यांना आनुवंशिक चाचण्या (जेनेटीक टेस्टिग) आणि संबंधित सेवा पुरवणे, उद्योग क्षेत्रात जैवतंत्रज्ञान संबंधित सल्लागार म्हणून काम करणे, जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ व पीक पैदासकार यांच्या समन्वयातून विविध पिकांचे वाण विकसित करणे आदी विषयावर त्यांनी माहिती दिली.

डॉ. यांनी कृषितील नवीन शैक्षणिक धोरण कृषी विकासात उपयोगी शेतकरी व कृषी संशोधन याच्या प्राधान्याबरोबर कृषी व्यापार व उद्योग यात लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर दिला. अधिष्ठाता डॉ. ठोंबरे यांनी जैवतंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, सेन्सर, आयओटी, मोबाईल एप्स ई. आधुनिक तंत्रज्ञांचा वापर शाश्वत कृषी विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

यावेळी सहयोगी अधिष्ठाता गजेंद्र लोंढे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख हिराकांत काळपांडे, डॉ. व्यंकट जगताप , डॉ. विजय भामरे,, डॉ. मोहन धुप्पे, डॉ. वसंत सूर्यवंशी यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वैष्णवी धांडगे हिने सूत्रसंचालन केले. ऋषिकेश मताळे याने आभार मानले. कार्यशाळेसाठी डॉ. अच्युत भरोसे, डॉ. महेंद्र दुधारे, डॉ.राहुल चव्हाण, डॉ. योगेश भगत, डॉ. दिप्ती वानखडे, वीरभद्र दुरुगकर, अभिजित देशमुख, गोवेसुद्दिन अन्सारी व किशोर घोळवे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT