Soyabean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Rate : सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा

Soyabean Market Rate : यंदा उत्पादकता कमी आल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दराची अपेक्षा आहे.

Anil Jadhao 

Soyabean Crop : देशातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक वाढत आहे. दिवाळीपर्यंत सोयाबीनची आवक पूर्ण जोमात होण्याची शक्यता आहे. पण शेतकऱ्यांना बाजारात मिळणारा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. दुसरीकडे काही ठिकाणी सोयाबीनची हमीभावाने खेरदी करण्याची मागणी केली जात आहे. पण यंदा उत्पादकता कमी आल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त दराची अपेक्षा आहे.

देशात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे दोन राज्य सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहेत. सध्या या दोन्ही राज्यांसोबतच राजस्थानध्येही सोयाबीनची आवक वाढत आहे. पण सोयाबीनची भावपातळी सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा कमी राहीली आहे. सोयाबीनला यंदा सरकारने ४ हजार ६०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला. मागील तीन ते चार दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा झाली आहे.

इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युध्दामुळे पुन्हा एकदा जागितक पातळीवर तणाव निर्माण झाला. काही अरब देश ईस्त्राईलच्या विरोधात भुमिका घेताना दिसतात.  या देशांनी कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करण्याची धमकी दिली. यामुळे जागतिक पातळीवर कच्या तेलाचे भाव वाढले आहेत. तेलाचे भाव वाढल्यानंतर अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये बायोडिझेलमध्ये सोयातेलाचा वापर वाढतो. याचा आधार सोयाबीनला मिळत आहे.

ब्राझीलमध्ये आता सोयाबीनची पेरणी सुरु आहे. पण ब्राझीलच्या काही भागात उष्णता वाढली. याचा पेरणीवर परिणाम होत असल्याचे अहवाल आहेत. या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनच्या वायद्यांनी एक महिन्यानंतर १३ डाॅलरचा टप्पा पार केला. सोयाबीनचे वायदे आज १३.१७ डाॅलरवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी दोन महिन्यांनतर ४०० डाॅलरची पातळी पार केली. सोयापेंड आज ४१७ डाॅलरवर पोचली होती.

देशातील बाजारातही सोयाबनचे भाव मागील आठवडाभरात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयाने वाढले आहेत. देशात सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. भाव कमी असल्याने काही ठिकाणी सोयाबीनची हमीभावाने खेरदी करण्याची मागणी होत आहे. पण यंदा सोयाबीनला हमीभाव मिळाला तरी शेतकऱ्यांना परवडणारे नाही. एकतर यंदा उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन किमान ३० ते ४० टक्क्यांनी घटले. त्यामुळे क्विंटलचा उत्पादन खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर उत्पादन खर्च भरून निघेल.

मागील हंगामातील २४ लाख टन शिल्लक साठा


एक ऑक्टोबरपासून आपल्या देशाचा सोयाबीनचा नवा हंगाम सुरु झाला. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने आपल्या ताज्या अहवालात मागील हंगामातील शिल्लक साठा २४ लाख टन असल्याचे स्पष्ट केले. तर १८ लाख टन सोयापेंड निर्यातीसह २०२२-२३ च्या हंगामाची सांगता झाल्याचेही सोपाने म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT