Leopard Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : आठ दिवसांत सहा बिबटे जेरबंद

Leopard Attack : काळवाडी येथील आठ वर्षीय मुलगा खेळत असताना आणि पिंपरी पेंढार येथील महिला बाजरीच्या पिकाची राखण करताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते.

Team Agrowon

Pune News : येथील वामन पट्ट्यातील (ता. जुन्नर) शेतकरी दत्तात्रेय वामन यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. १५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक सुमारे सहा वर्षे वयाची मादी बिबट्या जेरबंद झाली. त्यामुळे या परिसरात गेल्या आठ दिवसांत पकडल्या गेलेल्या बिबट्यांची संख्या सहा झाली आहे.

काळवाडी येथील आठ वर्षीय मुलगा खेळत असताना आणि पिंपरी पेंढार येथील महिला बाजरीच्या पिकाची राखण करताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. तसेच, पिंपळवंडी येथील एक तरुणी शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती.

या घटनांनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या परिसरात ३० पिंजरे लावले होते. त्यात काळवाडी, पिंपळवंडी व पिंपरी पेंढार या गावांत मागील आठ दिवसांत एकूण सहा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

वामन पट्ट्यात बुधवारी पकडलेल्या बिबट मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात वनपाल संतोष साळुंखे, वनसहायक रोशन नवले, बाबाजी खर्गे यांनी हलविले, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.दरम्यान, सहा बिबटे पकडल्यानंतरही नागरिकांना बिबट्यांचे दर्शन वेगवेगळ्या भागात होत आहे.

हल्ल्याच्या सर्व घटना या सकाळी, तसेच सायंकाळच्या वेळेस झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभाग करत आहे. तसेच, मानव- बिबट सहजीवनासंदर्भात वनविभाग वाडी-वस्तीवर जाऊन बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT