Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : सांगली जिल्ह्यातील सहा कारखान्यांची धुरांडी थंडावली

Sugarcane Production : सांगली जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सहा कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या आटोपला आहे. १६ साखर कारखान्यांनी ८४ लाख ५० हजार टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सहा कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या आटोपला आहे. १६ साखर कारखान्यांनी ८४ लाख ५० हजार टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्यांचा सरासरी ११.१८ टक्के उतारा गळीत हंगामात मिळाला आहे. मार्चच्या अखेरपर्यंत हंगाम संपण्याची शक्यता कारखानदारांनी वर्तवली आहे.

जिल्ह्यात यंदा १६ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. हंगामात १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवरील उसाचे गाळपासाठी १५ साखर कारखाने सुरू झाले. ऊसदराचा प्रश्न आणि अवकाळी पाऊस यामुळे गाळप हंगामास गती आली नव्हती. त्यानंतर गाळप सुरू झाले असले तरी,

दराचा प्रश्न सुटला नसल्याने कारखानदारांनी आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन गाळप सुरू ठेवले होते.त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तासगाव येथील एस. जी. झेड कारखान्याने गाळप सुरू केल्याने गाळप करणाऱ्या कारखान्याची संख्या १६ झाली. त्यानंतर गाळपास गती आली.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राजारामबापूचे जत व आरगचा मोहनराव शिंदे या कारखान्यांचा हंगाम आटोपला होता. त्यानंतर राजारामबापूचे वाटेगाव, कारंदवाडी, शिराळ्याचा दायमिलाय (निनाई), श्रीपती शुगर या चार कारखान्यांची धुराडी थंडावली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ७८ लाख टन उसाचे गाळप करत ८६ लाख १२ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. तिसऱ्या आठवड्यात ८४ लाख ५० हजार टन गाळप करत ९४ लाख ४९ हजार क्विंटल उत्पादन झाले.

जिल्ह्यातील साखर कारखानानिहाय गाळपाचे चित्र

कारखाना गाळप (टन) साखर उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)

दत्त इंडिया, सांगली ७ लाख ९१ हजार ८ लाख ९३ हजार ११.४१

राजारामबापू, साखराळे ८ लाख १६ हजार ९ लाख ६३ हजार ११.८५

विश्वास, चिखली ५ लाख ६५ हजार ६ लाख ८० हजार १२.१८

हुतातमा, वाळवा ४ लाख ९५ हजार ६ लाख १८ हजार १२.२८

राजारामबापू, वाटेगाव ४ लाख ८२ हजार ६ लाख ११ हजार १२.६२

एसजीझेड, तासगाव १ लाख ३१ हजार १ लाख ७ हजार ८.४२

राजारामबापू, तिपेहळ्ळी १ लाख ८४ हजार २ लाख ६ हजार १०.३१

सोनहिरा, वांगी ९ लाख ५८ हजार १० लाख ४९हजार ११.४९

क्रांतिअग्रणी, कुंडल १० लाख १९ हजार १० लाख ८७ हजार ११.८६

राजारामबापू, कारंदवाडी ३ लाख ८३ हजार ४ लाख ८० हजार १२.५०

मोहनराव शिंदे, आरग २ लाख ५४ हजार २ लाख ७० हजार १०.५८

निनाईदेवी, कोकरूड ५ लाख ०१ हजार ६ लाख ०६ हजार ११.८९

यशवंत, नागेवाडी १ लाख २९ हजार १ लाख ४० हजार १०.७१

केन अॅग्रो, डोंगराई २ लाख २७ हजार २ लाख १७ हजार १०.२६

उदगिरी, पारे ६ लाख १५ हजार ६ लाख ६२ हजार १०.७६

सद्‌गुरू, राजेवाडी ५ लाख ९३ हजार ५ लाख ३१ हजार ९.२९

श्रीपती शुगर, डफळापूर ३ लाख ३ लाख २४ हजार १०.७१

एकूण ८४ लाख ५० ९४ लाख ४९ हजार ११.१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT