PM Rural Housing Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल

PM Housing Scheme : पंतप्रधान योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टांच्या १२८.१२ टक्के काम करीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : पंतप्रधान योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टांच्या १२८.१२ टक्के काम करीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या वर्षात जिल्ह्यात ७ हजार ९७ इतकी घरकुल मंजूर झाली आहेत.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ५ हजार ५३९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

परंतु जिल्हा प्रशासनाने ७ हजार ९६ इतक्या घरकुलांना प्रथम हप्ता मंजूर करीत उद्दिष्टांच्या १२८.१२ टक्के केले आहे.याशिवाय नव्याने ९ हजार ९३६ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून १०० टक्के घरकुलांना मंजुरी दिली आहे.

पाच ग्रामपंचायतींची निवड

पंतप्रधान आवास योजनेचे सिंधुदुर्गात अतिशय चांगले काम सुरू आहे. जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ले आणि कणकवली तालुक्यांतील पाच ग्रामपंचायतींची गृह उत्सवांसाठी निवड करण्यात आली आहे.

यामध्ये वेंगुर्लेतील शिरोडा, परूळ बाजार, सावंतवाडीतील निरवडे, कणकवलीतील कलमठ, कुडाळातील माणगाव या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT