Gharkul Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Pradhan Mantri Gharkul Yojana : पंतप्रधान घरकुल योजनेत सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ; जिल्ह्यात ९९.२८ टक्के काम पूर्ण

Gharkul Yojana : पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ९७९ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ठरला असून जिल्ह्यात या योजनेचे ९९.२८ टक्के काम झाले आहे.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ९७९ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ठरला असून जिल्ह्यात या योजनेचे ९९.२८ टक्के काम झाले आहे.

पंतप्रधान घरकुल योजना सुरू झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता ५ हजार १५ घरांना मंजुरी मिळाली होती. त्यात आता नव्याने २०२४-२५ करिता ६०५ घरकुलांना मान्यता मिळाली आहे. दरम्यान ५ हजार १५ पैकी ४ हजार ९७९ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

उर्वरित ३६ घरकुलांचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. या योजनेचे जिल्ह्यात ९९.२८ टक्के काम पूर्ण झाले असून या योजनेत सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ठरला आहे.

दरम्यान, आता टप्पा दोनअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता नव्याने ६०५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण १ लाख २० हजार अनुदान चार टप्प्यात दिले जाते.

पहिला १५ हजार, दुसरा हप्ता ७० हजार, तिसरा टप्पा ३० हजार, अंतिम टप्पा पाच हजार रुपये असा दिला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT