cashew seed subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Cold Weather : सिंधुदुर्गात गारठा वाढला; आंबा, काजू बागायतदारांना दिलासा

Cold Season : जिल्ह्यात गारठा वाढला असून सलग दोन दिवस या वर्षातील नीचांकी १०.५ किमान तापमानाची नोंद मुळदे संशोधन केंद्रावर झाली.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurgnagari News : सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात गारठा वाढला असून सलग दोन दिवस या वर्षातील नीचांकी १०.५ किमान तापमानाची नोंद मुळदे संशोधन केंद्रावर झाली. त्यामुळे जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. दरम्यान या थंडीचा आंबा, काजू पिकांना फायदा होणार असल्याने बागायतदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून तापमानात दिवसागणिक घट होताना दिसत आहे. सोमवारी जिल्ह्यात ११ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली होती. परंतु मंगळवारी आणि बुधवारी या वर्षातील नीचांकी १०.५ अंश सेल्शियस तापमानाची नोंद मुळदे केंद्रांवर झाली. त्यामुळे जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून हुडहुडी जाणवत होती. अनेक नागरिकांनी पहाटेचे मॉर्निग वॉक थांबविले तर काहींनी उशिरा सुरू केले.

दरम्यान आणखी काही दिवस थंडीचे प्रमाण कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. बुधवारी दिवसभर वातावरणात प्रचंड गारवा जाणवत होता. गारव्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत नव्हता. दरवर्षी नोव्हेबरमध्ये थंडीला प्रारंभ होतो. परंतु यावर्षी विलंबाने थंडीला प्रारंभ झाला.

आंबा काजूला पोषक

थंडीमुळे आंबा, काजू बागायतदार चांगलेच सुखावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीच्या वातावरणामुळे आंबा, काजू हंगामाला पोषक वातावरण तयार झाले आहे. या थंडीमध्ये आंबा, काजू बागायतदारांनी कीटकनाशक, खते फवारणी करताना विद्यापीठाच्या शिफारशींचा अभ्यास करून घेतल्यास त्याचा चांगला फायदा होईल, असा सल्ला मुळदे संशोधन केंद्रांकडून देण्यात आला आहे.

७० टक्के काजूला मोहर आणि पालवी

३ ते ८ डिसेबर हा कालावधी वगळता जिल्ह्यात यावर्षी काजू पिकाला पोषक वातावरण आहे. यापूर्वी पडलेली थंडी आणि आता सुरू असलेल्या थंडीमुळे काजू पिकाला चांगली पालवी आणि मोहर देखील आला आहे. आतापर्यंत ७० टक्के काजू कलमांना मोहर आला आहे. यावर्षी हंगाम विलंबाने सुरू होणार असला तरी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा काजू बागायतदारांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT