Silkworm Post-Processing Training Centre  Agrowon
ॲग्रो विशेष

Silkworm Post-Processing Training Centre : बारामतीत होणार रेशीम कोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र

Baramati APMC : बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात एक एकर जागेवर रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ व कोषोत्तर प्रक्रियेचे पथदर्शक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच कोषोत्तर प्रक्रियेला चालना मिळावी या उद्देशाने बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात एक एकर जागेवर रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ व कोषोत्तर प्रक्रियेचे पथदर्शक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.

सध्या या केंद्राचे काम वेगाने सुरू असून लवकरच हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार, असल्याची माहिती जिल्हा रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

पुणे विभागात चालू वर्षी ७७० शेतकऱ्यांनी ९८४ एकरांवर तुती लागवड झाली आहे. तर सध्या विभागात पाच हजार ६२४ शेतकऱ्यांनी सहा हजार २७२ एकरावर तुती लागवड केली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात रेशीम कोषाचे उत्पादन होत असून या कोषाची विक्री बारामती, बीड, जालना तसेच कर्नाटकमधील रामनगर येथे शेतकरी करतात.

शेतकऱ्यांना रेशीम आधारित प्रक्रियेकडे वळविण्यासाठी रेशीम संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या केंद्रामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून प्रक्रिया उद्योग वाढीस लागून रोजगार संधी उपलब्ध होईल.

शासनामार्फत या प्रशिक्षण केंद्राच्या सोयी सुविधा उभारण्यासाठी सुमारे ९ कोटी ५६ लाख ६२ हजार रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बारामती येथे रेशीम प्रशिक्षण केंद्राच्या सोयी-सुविधांसाठी दोन टप्प्यांत निधी उपलब्ध करून दिला आहे. रेशीम कार्यालयाचे तालुका कार्यालय, रेशीम कोष खरेदी-विक्री कार्यालय, विस्ताराचे कार्यालय येथे राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT