Silk production Agrowon
ॲग्रो विशेष

Silk And Milk Project : परभणी जिल्ह्यातील ९ गावांमध्ये सिल्क आणि मिल्क प्रकल्प

Team Agrowon

Parbhani News : रेशीम शेती व दुग्ध व्यवसाय यांची सांगड घालून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सिल्क आणि मिल्क प्रकल्पांमध्ये परभणी जिल्ह्यातील ९ गावांची निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पात समाविष्ट शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँकेकडून गाई, म्हशी खरेदी, रेशीम कीटक संगोपनगृह उभारणीसाठी अर्थसाह्य केले जात आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

मराठवाड्यामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने सिल्क आणि मिल्क हा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांमध्ये परभणी जिल्ह्यातील मंगरूळ, पाळोदी (ता. मानवत), मानकेश्‍वर, शेवडी (ता. जिंतूर), डोंगरपिंपळा, (ता. गंगाखेड), चुडावा, रुपला, कावलगाव, (ता. पूर्णा), आलेगाव (ता. सोनपेठ) या गावांची निवड करण्यात आली आहे.

मंगरूळ (ता. मानवत) येथील २२ शेतकऱ्यांची सिल्क आणि मिल्क प्रकल्पात निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत मंगळवारी (ता. १५) मंगरूळ येथील गुलाब जडे यांच्या तुती बागेत रेशीम कीटक संगोपनगृह बांधकामाचे उद्‍घाटन करण्यात आले.

या वेळी विभागीय व्यवस्थापक सम्राट पुरकायस्थ, जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उदय कुलकर्णी, भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंम रोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक जितेंद्रसिह कुशवाह, मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, उत्तम बदाले, सुनील हट्टेकर, संग्राम झावरे, अमित देशपांडे, सचिन अवचार, विमल अग्रवाल, मोहन कापसे, गोविंद देशमाने, अशोक नाईकनवरे, गुलाब जडे आदी शेतकरी उपस्थित होते.

कदम म्हणाले, की रेशीम शेती व दुग्ध व्यवसाय या दोन पूरक व्यवसायांची सांगड अधिक फायदेशीर ठरते. तुतीची पाने प्रथिनयुक्त पौष्टिक पशुखाद्य आहे. रेशीम कीटकांच्या संगोपनातून शिल्लक राहिलेल्या तुतीचा पशुआहारात समावेश केल्यास दुधातील सिंग्धशांचे (फॅट) प्रमाण वाढते. दुग्धोत्पादनात वाढ होते. तुती लागवड मनरेगातून अनुदान दिले जाते.

हट्टेकर म्हणाले, की रेशीम कीटक संगोपनगृह व दोन दुधाळ जनावरे खरेदीसाठी मुदत कर्ज तर तुती लागवड, रेशीम कीटक संगोपन व पशुखाद्य, औषधी व इतर खर्चासाठी पीककर्ज दिले जाईल. डॉ. लटपटे म्हणाले, की रेशीम कीटक संगोपनासाठी पक्के शेड बांधणीची संगोपनगृहातील तापमान व आर्द्रता योग्य राखणे गरजेचे आहे. पूरकायस्थ म्हणाले, की सिल्क आणि मिल्क प्रकल्पात भारतीय स्टेट बँक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

Orchard Cultivation : जलकुंड आधारित फळबाग लागवड वरदान

Grape Producer : द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवा

Rain Update : सलग दोन दिवसांपासून पावसाची जिल्ह्यात ‘बरसात’

SCROLL FOR NEXT