PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : ‘पीएम किसान’च्या फाईलवर सही करून मोदींकडून कामाचा श्रीगणेशा

PM Narendra Modi : पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेच कामाला लागले असून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या (पीएम किसान) हप्ता जारी करण्यासंदर्भातील फाईलवर सोमवारी (ता. १०) सकाळी त्यांनी सही केली.

Team Agrowon

New Delhi News : पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेच कामाला लागले असून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या (पीएम किसान) हप्ता जारी करण्यासंदर्भातील फाईलवर सोमवारी (ता. १०) सकाळी त्यांनी सही केली.

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी सही केलेली ही पहिली फाइल ठरली. योजनेचा १७ वा हप्ता चालू महिन्यातच शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ‘डीबीटी’च्या माध्यमातून वर्ग होत असतो.

९.३ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये वर्ग होणार आहेत. याआधी पीएम किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता २८ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता.

‘‘शेतकऱ्यांच्या कल्याणसाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे,’’ असे पंतप्रधान मोदी फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT