Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : कांदा लागवडीसाठी महिला मजुरांची टंचाई

Onion Cultivation : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहनातून लांबून मजूर आणावे लागत असून, त्यासाठी जास्त खर्च होत आहे.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव : तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील कांदा लागवड जोरात सुरू असून, लागवडीसाठी महिला मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहनातून लांबून मजूर आणावे लागत असून, त्यासाठी जास्त खर्च होत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोडनदीच्या काठावर तसेच डिंभा उजव्या कालव्यालगत असलेल्या अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पारगाव, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, धामणी, वाळुंजनगर, काठापूर बुद्रुक, देवगाव, लाखणगाव या गावांत खरीप व रब्बी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

परिसरात सर्वत्र कांदा लागवड सुरू असल्याने शेतमजुरांचा तुटवडा भासत आहे. शेतकऱ्यांना वाहन पाठवून लांबून जिरायती भागातून मजूर आणावे लागत आहे. वाहनासाठी दररोज अंतरानुसार एक हजार ते दीड हजार भाडे द्यावे लागत आहे. एक महिलेला कांदा लागवडीसाठी प्रती दिन ३५० रुपये मजुरी द्यावे लागते.

एका महिला मजुरासाठी सरासरी १०० रुपये वाहनखर्च येत आहे. एक एकर क्षेत्रातील कांदा लागवड करण्यासाठी १४ ते १६ महिला मजूर लागतात, तर मल्चिंग पेपरचा वापर केला असेल तर एक एकर क्षेत्रातील कांदा लागवड करण्यासाठी २० ते २२ महिला मजूर लागतात.

मजुरांच्या तुटवड्यामुळे मजुरीवर जास्त खर्च करावा लागत असल्याचे वाळुंजनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापारी महेंद्र वाळुंज तसेच धामणी येथील कांदा उत्पादक अमोल जाधव यांनी सांगितले .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT