Urea Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage : अकोल्यात शोधाशोध करूनही युरिया मिळेना

Urea Shortage in Vidarbha : अकोला जिल्ह्यात ऐन खऱीप हंगामात युरिया खताचा तुटवडा‎ निर्माण झाला असून खरीप पिकांच्या‎ उत्पादनात घट येण्याची शक्यता‎ निर्माण झाली आहे. यामुळे ‎ ‎ शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण‎ आहे.

Team Agrowon

Akola Urea News : पिकांना खतमात्रा देण्यासाठी शेतकरी युरियाची शोधाशोध करीत आहेत. पुरवठा कमी होत असल्याने दिवसेंदिवस बिकट परिस्थिती होत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचाही प्रयत्न करीत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

अकोला जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत सुमारे १८ हजार टन युरियाचा पुरवठा अपेक्षित होता. मात्र, आतापर्यंत केवळ १२ ते साडेबारा हजार टन युरिया पुरविण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच आता पाऊस उघडल्याने कपाशी व इतर पिकांना युरिया टाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग सुरु आहे. मात्र युरिया मिळत नसल्याने ओढाताण होत आहे. सोमवारी (ता.२१) बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागात आंदोलन करीत अधिकाऱ्यांसह काही कृषी विक्रेत्यांकडे पाहणी केली.

अधिकाऱ्यांसमोर विक्रेत्याने युरिया नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे मात्र झाडाझडती घेतली असता २३ बॅग युरिया मिळाला. असे प्रकार सर्रास सुरु असून काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करीत फायदा उठवत आहेत. या विक्रेत्याच्या मालाचा तत्काळ पंचनामा करण्यात आला. युरियाची वाढती मागणी पाहता ३१२ टन बफरस्टॉक जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रिलीज करण्यात आला. पॉसवर अडीच हजार टन साठा दिसत आहे. तरीही ग्रामीण भागात युरियाची टंचाई आहे.

‘वाशीम, बुलडाण्यात परिस्थिती नियंत्रणात’

‘‘वाशीम जिल्ह्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑगस्टच्या सुरवातीला युरियाबाबत ओरड झाली. मात्र, नंतर विविध कंपन्यांचा रॅक लागल्याने युरियाचा प्रश्न मिटला आहे. सध्या मुबलक युरिया उपलब्ध असल्याची माहिती प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांनी दिली. तर बुलडाणा जिल्ह्यात युरियाची टंचाई नाही. रेल्वेरॅक सातत्याने येत असल्याने युरिया पुरेसा आहे,’’ अशी माहिती कृषी विकास अधिकारी सी. एन. पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

UPI Rule: यूपीआयच्या नियमात झाले मोठे बदल; फसवणूक टाळण्यासाठी सुधारणा

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी; HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली!

Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Agriculture Input GST : शेती अवजारांवरील जीएसटी रद्द होणार?

Crop Damage Compensation : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४० कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT