Cotton seed Varieties Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Shortage : सरळ कापूस वाणांचा खानदेशात तुटवडा

Seed Black-market : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ कापूस वाणांची पूर्वहंगामी (बागायती) लागवड केली जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ कापूस वाणांची पूर्वहंगामी (बागायती) लागवड केली जात आहे. पण या वाणांचा तुटवडा आहे. काळ्याबाजारात खतपाणी मिळत आहे. मागणी सुमारे तीन ते साडेतीन लाख पाकिटांची आहे, पण सरळ वाणांच्या पाच हजार पाकिटांचा देखील पुरवठा खानदेशात झालेला नाही.

केळी पट्ट्यात म्हणजेच जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा आदी भागांत अनेक शेतकरी केळी व इतर पिकांसाठी बेवड म्हणून सरळ किंवा देशी कापूस वाणांची लागवड करतात. ही लागवड पूर्वहंगामी अधिक असते.

कारण केळी पट्ट्यात जलसाठे मुबलक आहेत. बऱ्यापैकी उत्पादन व बेवड मिळत असल्याने केळी पट्ट्यात या वाणांची अनेक वर्षे मागणी आहे. पण त्यांचा काळाबाजारदेखील अनेक वर्षे सुरू आहे. कंपन्याच कमी पुरवठा करतात, असा दावा कृषी विभाग करीत आहे. खानदेशात एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे २७ लाख १० हजार कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा यंदा होणार आहे. यात ९५ ते ९७ टक्के बियाणे बीटी कापसाचे आहे.

धुळे व नंदुरबारातही अशीच स्थिती आहे. बीटी कापूस वाणांचा पुरवठा खानदेशात पुरेसा व वेगात झाला आहे. जळगाव जिल्ह्यात बीटी कापूस बियाण्याचाही काळाबाजार सुरू आहे. त्यात आता सरळ वाणांचा काळाबाजार वाढला आहे. त्यात सरळ कापूस वाणांचा अत्यल्प पुरवठा झाला आहे.

हेक्टरी किमान अडीच पाकिटे सरळ वाणांची लागवडीसाठी आवश्यक आहेत. खानदेशात किमान एक ते सव्वा लाख हेक्टरवर या वाणांची लागवड अपेक्षित असते. पण बियाणे पुरवठा दरवर्षी १५ ते २० हजार पाकिटे एवढाच असतो. हा पुरवठादेखील वेळेत नसतो. यामुळे लागवड हव्या तेवढ्या क्षेत्रात होत नाही, शिवाय काळाबाजार फोफावतो.

पाकिटामागे दीड ते दोन हजार अधिकचे रुपये मोजावे लागतात

यंदाही हा काळाबाजार सुरू आहे. काही शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातमधून या वाणांची उपलब्धता करून घेत आहेत. त्यासाठी पाकिटामागे दीड ते दोन हजार अधिकचे रुपये मोजावे लागत आहेत. बियाण्याचा खर्च दुप्पट झाला आहे, त्यास कृषी यंत्रणा व संबंधित जबाबदार असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. काळाबाजार शेतकऱ्याला अपेक्षित नसतो, तो कसा सुरू होईल, याची व्यवस्थाच जणू कृषी यंत्रणा व संबंधित हंगामाच्या सुरुवातीला करून ठेवतात, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT