Eggs in Midday Meal Agrowon
ॲग्रो विशेष

Midday Meal : शालेय पोषण आहाराचा अनेक भागांत तुटवडा

School Nutrition : अकोले तालुक्यासह नगर जिल्ह्यातील अनेक भागांत शालेय पोषण आहाराचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : अकोले तालुक्यासह नगर जिल्ह्यातील अनेक भागांत शालेय पोषण आहाराचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत तक्रारी करूनही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.

उलट अधिकारीच पुरवठादाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व पुरवठादारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा परिषदेतील भाजपचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले, की शासन विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देते. मात्र, अकोले तालुक्यासह नगर जिल्‍ह्यातील अनेक भागांत पोषण आहार वेळेवर मिळत नसल्याचे प्रकार येऊ लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तर विद्यार्थ्यांना पोषण आहारच मिळालेला नाही. यातून अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. जर पोषण आहार मिळाला तर तो निकृष्ट तरी असतो.

अनेक वेळा वजन कमी असते. यावरून अधिकारी पुरवठादाराला पाठीशी तर घालत नाहीत ना, अशी शंकाही वाकचौरे यांनी उपस्थित केली आहे. विशेष म्हणजे पुरवठादाराचे बिल मात्र वेळेवर देतात.

त्यामुळे जितके दिवस पोषण आहाराचे खाडे झाले त्याची भरपाई मिळावी आणि संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण विभागाचे आयुक्त, शिक्षण मंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Pest Control: तुरीवरील पाने गुंडाळणाऱ्या अळीची कशी ओळखाल?

E-Praman Portal : ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन

Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा

Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार

Vegetable Market : फळ-भाजीपाला बाजार सुरू करून उत्पन्नवाढीवर भर

SCROLL FOR NEXT