Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Rate : खतासाठी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची होतेय अडवणूक

Fertilizer Linking : डहाणू तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना खतविक्री करण्यासाठी बियाण्यांची पावती मागण्यात येत आहे. ज्यांनी त्या केंद्रावरून बियाणे घेतले नसेल, अशा शेतकऱ्यांना युरिया किंवा अन्य रासायनिक खते दिली जात नाहीत.

Team Agrowon

Palghar News : जिल्ह्यात सध्या भातपेरणीच्या कामाला वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या कामात व्यग्र आहेत, मात्र याच काळात काही कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आमच्याकडून भात खरेदी केल्याशिवाय खत मिळणार नाही, असा अजब फतवा काही विक्रेत्यांकडून जारी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. डहाणू तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना खतविक्री करण्यासाठी बियाण्यांची पावती मागण्यात येत आहे.

ज्यांनी त्या केंद्रावरून बियाणे घेतले नसेल, अशा शेतकऱ्यांना युरिया किंवा अन्य रासायनिक खते दिली जात नाहीत. या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली असून, विशेषतः गरीब व आदिवासी शेतकरी यामुळे अडचणीत आले आहेत.

याशिवाय काही कृषी सेवा केंद्रांवर शासकीय दरापेक्षा जास्त किमतीने खते-विक्री केली जात असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. छापील किमतीपेक्षा वाढीव दराने खतविक्री होत असल्याने याचा आर्थिक फटका थेट शेतकऱ्यांनाच बसत आहे.

याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. शेतकऱ्यांचे जीवन आधीच निसर्गावर आणि बाजाराच्या चढ-उतारावर अवलंबून आहे. त्यातच जर सरकारी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या खते, बियाणे यांसाठीदेखील अटी-शर्ती लादल्या जात असतील, तर हे दुर्दैवी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT