ॲग्रो विशेष

Manifesto of Thackeray Shivsena : भूमिपुत्रांना नोकरी, मुलांनाही मोफत शिक्षण, जुनी पेन्शनही देऊ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा वचननामा जाहीर केला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष मतदारांसमोर जाण्यासाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर करत आहेत. बुधवारी (ता.६) महाविकास आघाडीने पंचसुत्री जाहीर केली. यापाठोपाठ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या पक्षाचा वचननामा गुरूवारी (ता.७) जाहीर केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुलांना मोफत शिक्षण देवून, नवे गृहधोरण राबवू असे वचन दिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) उद्धव ठाकरे यांनी आपला वचननामा सांगितला यावेळी. त्यांनी महाविकास आघाडीचा देखील लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. पण या जाहीरनाम्यापेक्षा आमच्या पक्षांचा वचननामा वेगळा नाही. आम्ही आघाडीच्या जाहीरनाम्यासोबत सहमत आहोत, असे म्हटले आहे.

यावेळी आघाडीचे सरकार आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्यासह, कोळीवाड्याची ओळख पुसली जाणार नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सरकार आल्यावर कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करू, राज्यातील वाढती बेरोजगारी थांबवण्यासाठी भूमिपुत्रांना नोकरी देवू, असे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

याचबरोबर राज्यातील विद्यार्थिनींना राज्य सरकार मोफत शिक्षण देत आहे. पण मुलगा आणि मुलगी असा भेद आमचे सरकार करणार नाही. आम्ही मुलांनाही मोफत शिक्षण देवू. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार असल्याचे अश्वासन उद्धव ठाकरे यांनी आपल्या वचननाम्यातून राज्यातील जनतेला दिले.

दरम्यान आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानास काहीच दिवस उरले असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT