Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा यादीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Agriculture Department : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा, या मागणीसाठी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले होते.

Team Agrowon

Yavtmal News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा, या मागणीसाठी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले होते. आश्‍वासन देऊनही कृषी विभाग तसेच पीकविमा कंपनीकडून मदत जमा झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिली नाही. त्यामुळे गुरुवारी (ता.२१) कृषी अधीक्षकांच्या कक्षात शिवसैनिकांनी आंदोलन केले.

अतिवृष्टी व अवकाळीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित होते. अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झाली नाही. जिल्हा संनियंत्रण समितीकडे नुकसानीच्या पाच लाख २५ हजार ५४१ पूर्वसूचना दाखल झाल्या.

त्यातील ३९ हजार ७६२ पूर्वसूचना समितीने अपात्र केल्या. मात्र, पात्र शेतकऱ्यांनाही भरपाई मिळाली नाही. विशेष म्हणजे एक लाख ७८ हजार ६२८ पूर्वसूचनांचा आकडेवारीनुसार मेळ लागत नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचा आहे. विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची पीकनिहाय यादी मागूनही विमा कंपनीकडून दिली जात नाही.

कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या कारणाने अपात्र केले, याची यादी देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शिवसेनेची आहे. पीकविमा कंपनीने जवळपास अडीचशे कोटी रुपयांची मदत वाटप केल्याचा दावा केला आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचा आहे. मदत दिलेल्या शेतकऱ्यांची यादी देण्यात या मागणीसाठी ठाकरे गटाने गुरुवारी (ता. २१) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

शिवसेना ठाकरे गटाने शेतकऱ्यांना पीकविमा मदत द्यावी, यासाठी पाठपुरावा केला. यानंतरही विमा कंपनीकडून मदत दिली जात नाही. याविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. या वेळी माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, सागर पुरी, गजानन डोमाळे, संजय रंगे, संदीप सरोदे, विनोद पवार, अतुल गुल्हाने, गजानन जांभोरे, गोपाल भोंग, पिंटू सावरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT