Shetkari Sangh Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Shetkari Sangh : शेतकरी संघाच्या लाल मिरचीवरून राजकारण झालं तिखट, संचालकाचा कारनामा चर्चेत

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या संचालकाने स्वतःच्या संस्थेच्या सभासदांसाठी खरेदी केलेल्या मिरचीतील काही शिल्लक मिरची संघाला विक्री केल्यावरून जोरदार चर्चा झाली.

sandeep Shirguppe

Shetkari Sangh Politics : कित्येक वर्षांपासून सभासदांचे हीत जपणारा शेतकरी संघ दिवसेंदिवस भ्रष्टाचाराच्या गाळात अडकून बदनाम होत आहे. मागच्या ५ वर्षात शेतकरी संघ विविध कारणातून चर्चेत आहे आता पुन्हा या संघात एका संचालकाने लाल मिरचीच्या माध्यमातून काळा बाजार केल्याने संघ चर्चेत आला आहे. दरम्यान संचालकाने केलेल्या कृत्यावर नेते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेतकरी संघाच्या संचालकाने स्वतःच्या संस्थेच्या सभासदांसाठी खरेदी केलेल्या मिरचीतील काही शिल्लक मिरची संघाला विक्री केल्यावरून जोरदार चर्चा झाली. संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयासह इतर चर्चा झाली.

शेतकरी सहकारी संघाच्या मिरची पावडरीला मोठी मागणी आहे. मोठमोठी हॉटेल आणि घरगुती वापरासाठी शेतकरी संघाच्या ब्रँडला लोकांची पसंती आहे. यासाठी चांगली व दर्जेदार मिरची, चांगला मसाला वापरला जातो. त्यामुळे या मिरची पावडरीची खासियत आहे.

दरम्यान, चांगल्या दर्जाच्या मिरचीची कर्नाटकमधूनच खरेदी केली जाते. लोकांना पसंत असणारी मिरची वापरूनच मिरची पावडर तयार केली जाते. मात्र, संघाच्या एका संचालकाने स्वतःच्या सहकारी संस्थेच्या सभासदांना देण्यासाठी खरेदी केलेली मिरची संघाला दिली. हे करत असताना इतर काही संचालकांना विश्वासत का घेतले नाही, यावरून संचालक मंडळाच्या बैठकी जोरदार चर्चा झाली.

संघाकडून मिरची खरेदीसाठी जीएसटी नंबर आवश्यक असतो. हा जीएसटी नंबर संबंधित संस्थेचा सभासदांचा होता. त्यानुसार कायदेशीर आणि आवश्यक बाबी पूर्ण करूनच मिरची खरेदी- विक्री केल्याचे संबंधित संचालकाने स्पष्टीकरण दिल्याचे चित्र आहे.

'शेतकरी संघ ज्यांच्याकडून मिरची खरेदी करत आहे, त्याच ठिकाणाहून संबंधितांनी मिरची खरेदी केली आहे. ती मिरची संघाला अपेक्षित आणि दर्जेदार आहे. संघाकडे मिरची पावडरीची मागणी वाढली होती. यावेळी तातडीची गरज म्हणून संघ ज्या पद्धतीची मिरची खरेदी करत आला आहे, त्याच प्रकारातील ही मिरची असल्यामुळे संघाची गरज म्हणून ही मिरची खरेदी केली होती. यामध्ये कोणताही मोठा मुद्दा नाही. - सचिन सरनोबत, कार्यकारी संचालक, शेतकरी संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT