Shetkari Sangh Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या निवडणुकीत रंगत वाढणार, मंत्री मुश्रीफ आणि युवराज पाटील यांच्यात गुपीत चर्चा

shetkari sangh election Kolhapur : शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी योग्य पॅनेल बांधणी व्हावी, यासाठी, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे.

sandeep Shirguppe

Shekari Sangh Kolhapur : शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी योग्य पॅनेल बांधणी व्हावी, यासाठी, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरला असला तरीही, सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच श्री पाटील यांच्याकडून पॅनेल बांधणी होईल, अशी सद्यस्थिती आहे.

याबाबत कागल येथील शासकीय विश्रामगृहात पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली.

शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहे. यामध्ये कोणतेही राजकारण असू नये, असा सूर होता. दरम्यान, माजी अध्यक्ष युवराज पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर त्याचा अर्ज अपात्र ठरला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याबाबतीची शक्यता धुसर झाली.

दरम्यान, माजी अध्यक्ष युवराज पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भू-विकास बँकेला जमीन तारण देऊन कर्ज घेतले होते. हे कर्ज शेतीसाठीच होते. कोरोनादरम्यान मोठ-मोठे शेतकरी थकीत राहिले.

तरीही, लाखो रुपयांचे थकीत कर्ज आपण भरले आहे. इतरांना हे कर्ज माफ झाले. कर्ज भरले असताना किंवा सध्या कोणतीही थकबाकी नसताना आपला अर्ज अपात्र कसा ठरला, याबद्दल चर्चा केल्याचे समजते.

कागल येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची काही कामानिमित्त भेट घेतली. आपल्या कामाव्यतिरिक्त इतरही काही चर्चा झाली. ही चर्चा काय होती, हे योग्य वेळी सांगितले जाईल, - युवराज पाटील, माजी अध्यक्ष, शेतकरी संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT