Kolhapur Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugarcane Season : कोल्हापुरात ऊस दरावरून शेतकरी संघटना आक्रमक, शिरोळ तालुक्यातील ऊसतोडी पाडल्या बंद

Sugarcane Season : जोपर्यंत शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणी एवढा दर मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेवू नयेत असे आवाहन अंकुशच्यावतीने करण्यात आले.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Rate : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर हंगामाला मागच्या ३ दिवसांपासून गती मिळाली आहे. परंतु एकाही साखर कारखान्याने दर निश्चित न करता कारखाने सुरू केल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यात सलग तीन दिवस आंदोलन अंकुशने ऊसतोडी बंद पाडल्या आहेत.

अर्जुनवाड, चिंचवाड, शिरटी, नांदणी, टाकवडे, दत्तवाड याठिकाणी पंचगंगा, जवाहर, शरद कारखान्याच्या तोडी बंद करण्यात आल्या. जोपर्यंत शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणी एवढा दर मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेवू नयेत असे आवाहन अंकुशच्यावतीने करण्यात आले.

सोमवारी (ता.२५) शिरढोण येथे जवाहर साखर कारखान्याकडून ऊसतोड सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ऊसतोड रोखली. त्यानंतर मंगळवारी (ता.२६) दुसऱ्या दिवशीही अर्जुनवाड, चिंचवाड, नांदणी, टाकवडे याठिकाणी ऊसतोडी सुरु बंद करण्यात आल्या. दरम्यान बुधवार (ता.२७) माहिती मिळाल्यानंतर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंद पाडल्या. परवडणारा दर मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनी तोडी घेवू नये. शेतकऱ्यांनी संयम पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आंदोलन अंकुश संघटनेने शिरोळ येथे एल्गार परिषद घेतली. यामध्ये गत हंगामातील अंतिम बिल २०० रुपये तर यंदाच्या हंगामील पहिली उचल ३ हजार ७०० रुपये एकरकमी दिल्याशिवाय कोयता चालू देणार नाही, असा इशारा दिला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद पार पडली. यामध्ये गळीत हंगाम सन २०२३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता देण्याची मागणी केली. तर गळीत हंगाम २०२४-२५ साठी ३ हजार ७०० रूपयांच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती.

परंतु याचा विचार न होता राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत आहे. आम्ही केलेल्या मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची येत्या १५ दिवसात तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांचेकडे केली. तसेच याबाबत कोणताही निर्णय न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचाही इशारा देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT