Anandacha Shidha Agrowon
ॲग्रो विशेष

Anandacha Shida : गणेशोत्सव संपत आला, कुठे आहे आनंदाचा शिधा?; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरकारला सवाल

Nationalist Congress Party-Sharad Chandra Pawar : गणपतीच्या आगमनामुळे घराघरात चैतन्याचे वातावरण आहे. पण अशातही गणेशोत्सवाचे निमित्ताने घोषित केलेला आनंदाच्या शिधा अद्याप काही ठिकाणी मिळालेला नाही.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्य सरकारने घोषित केलेल्या गणेशोत्सव काळातील आनंदाचा शिधा अद्याप काही ठिकाणी पोहचलेला नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गटाने सरकारवर टीका केली आहे. गणेशोत्सव संपत आला, तरी जनसामान्यांना आंनदाचा शिधा मिळाला नाही. पण महायुती सरकारच्या भ्रष्ट नीतीने काळ्याबाजारात आनंदाचा शिधाची विक्री होत असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने म्हटले आहे.

गणेश उत्सव डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने अंत्योदय योजनेत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. चणा डाळ, तेल, साखर, रवा असे चार जिन्नस मिळणार होते. तर चणा डाळ एक किलो, सोयाबीन तेल एक लीटर, साखर एक किलो आणि रवा एक किलो असे दिले जाणार होते. राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांचा सण गोड करण्यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला. मात्र अद्यापही तो राज्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेला नाही.

यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गटाने सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारकडून सण-उत्सवानिमित्त वितरित केला जाणारा 'आनंदाचा शिधा' गणेशोत्सव संपत आला तरी जनसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. पण दुसरीकडे मात्र महायुती सरकारच्या भ्रष्ट नीतीने आनंदाचा शिधा' काळ्याबाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे शरद पवार गटाने म्हटले आहे.

तसेच कशी वाटली महायुतीची कमाल? या सरकारने जेवढा पैसा जाहिरातींवर खर्च केला तेवढा योजनेच्या अंमलबजावणीसाठी केला असता तर सर्व गणेशभक्तांचा उत्सव गोड झाला असता, असाही टोला सरकारला लगावला आहे.

१ लाखाहून अधिक कार्डधारकर वंचित

राज्यातील १ लाख ३५ हजार पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्यासाठी सरकारकडून तब्बल ५६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पण फक्त २२ हजारांनाच आनंदाचा शिधा मिळाला आहे. तर १ लाखाहून अधिक कार्डधारकांना अद्यापही शिधा मिळालेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव संपण्याच्या आधीतरी आनंदाचा शिधा मिळणार का? असा सवाल आता शिधापत्रिकाधारकांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT