Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktieeth Highway : शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यव्यापी लढ्याचे रणशिंग फुंकणार; कृती समितीचा इशारा

Maharashtra Government : सरकारने हा रस्ता करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. त्याला तीव्र विरोध असून तो रद्दच झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Shaktipeth Mahamarg : राज्यातील बारा जिल्ह्यांतून जाणारा प्रस्तावित संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू आहे. परंतु, सरकारने हा रस्ता करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. त्याला तीव्र विरोध असून तो रद्दच झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात राज्यव्यापी बैठकीत लढ्याचे रणशिंग फुंकले जाईल, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी बुधवार (ता.१५) दिला.

फोंडे म्हणाले, "राज्य सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये या मार्गाला विरोध नसल्याचे चित्र सरकारकडून रंगविले जात आहे. परंतु, इतर जिल्ह्यात सुरू असलेली आंदोलने सरकारला दिसत नाहीत का? असा प्रश्न आहे. त्यातच या महामार्गासाठी पर्यावरणीय परवानगी एका दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी न करता हा प्रकार केला असून त्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे" असे फोंडे यांनी सांगितले.

"तसेच, कोल्हापूर या महामार्गातून वगळले असल्याचे मंत्र्यांकडून सांगितले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांचा यावर विश्वास नसून त्याबाबत संभ्रम आहे. यासाठी जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्वपक्षीयांसह शेतकऱ्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे." असेही फोंडे म्हणाले.

तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश

राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीने प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने काम सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT