Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : खानदेशात ऊस लागवडीत शहादा तालुका आघाडीवर

Sugarcane Farming : खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे.

Team Agrowon

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात ऊस लागवड सुमारे १६ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. त्यात शहादा तालुक्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. \

शहादा तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे. नंदुरबारात सुमारे १४ हजार हेक्टवर ऊस पीक आहे.

शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊस पीक क्षेत्र चार ते सहा हजार हेक्टरदरम्यान होते. शेतमालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल दर, मजूरटंचाई यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या साहाय्याने बागायती शेती केली जाते.

त्याचबरोबर केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे; परंतु त्या मानाने अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे.

परिणामी उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. परिसरात चार कारखाने आहेत. त्यामुळेही लागवडीला बळ मिळाले आहे. सुधारित जातीचे ऊस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT