SEZ project Agrowon
ॲग्रो विशेष

SEZ Project : सेझ प्रकल्‍पबाधितांना जमिनी परत मिळणार

Raigad News : पेण-उरण-पनवेल तालुक्यातील ४५ गावांच्या सुपीक शेतजमिनी सेझसाठी संपादन करण्याचा प्रयत्न झाला होता.

Team Agrowon

Alibaug News : पेण-उरण-पनवेल तालुक्यातील ४५ गावांच्या सुपीक शेतजमिनी सेझसाठी संपादन करण्याचा प्रयत्न झाला होता. येथील शेतकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध करून सेझ रद्द करायला लावला. काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सेझ कंपनीला दिल्या. त्यास पंधरा वर्ष उलटून गेली असून कंपनीने येथे कोणताही प्रकल्प राबवला नाही.

त्‍यामुळे या जमिनी कंपनीने परत कराव्यात अशी मागणी लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केली. यास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मकता दर्शविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

२००८ मध्ये सेझ प्रकल्प रद्द झाला. जमिनी घेउन १५ वर्षे झाली तरी कोणताही प्रकल्प किंवा काम न झाल्‍याने कायद्याने या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाल्या पाहिजे यासाठी दोन वर्षांपासून शेतकरी संघर्ष करत आहेत.

मंगळवारी दुपारी मंत्रालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी आमदार जयंत पाटील यांनी १५ वर्षांत प्रकल्‍प उभा न राहिल्‍याने शेतकऱ्यांना जमिनी परत करा, कंपनी स्वतःच यातून बाजूला झाल्‍याने संपादित जमिनी परत करण्याचा निर्णय घेण्याची मागणी विखे पाटील यांच्याकडे पाटील यांनी केली.

बैठकीस कोकण आयुक्त, पुनर्वसन सचिव, माजी आमदार धैर्यशील पाटील, २४ गाव संघर्ष संयुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

पंधरा वर्षे होऊनही शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीवर काहीही करता आलेले नाही. पेण तालुक्यातील २४ गावांमधील २२ गावे हेटवणे सिंचन क्षेत्रात येतात. या गावांमधील जमीन सुपीक आहे. त्यामुळे त्या परत मिळाल्यास उपजीविकेचे साधन निर्माण होईल, महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
आमदार जयंत पाटील

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Organic Fertilizer : भरडधान्याच्या उत्पादकतेत जैविक निविष्ठांचे मोठे योगदान ः तायडे

Raju Shetti: चालू हंगामात उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये विनाकपात पहिली उचल मिळावी, राजू शेट्टींनी कारखानदारांना दिली १० नोव्हेंबरची डेडलाईन

Ice-Cream Business : अल्पभूधारक शेतकऱ्याने उभारला आइस्क्रीम उद्योग

Irrigation Project: विदर्भ व तापी खोऱ्यातील सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करा; गिरीश महाजनांचे आदेश

Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

SCROLL FOR NEXT