Solid Waste Management Agrowon
ॲग्रो विशेष

Sewage, Solid Waste Management : नांदेड जिल्ह्यातील ४८५ गावांत सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन

Swaccha Bharat Mission : गावात सांडपाण्यापासून होणारी दुर्गंधी तसेच गावातील ओला आणि सुका तसेच प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे काम स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत सुरू झाले आहे.

Team Agrowon

Nanded News : गावात सांडपाण्यापासून होणारी दुर्गंधी तसेच गावातील ओला आणि सुका तसेच प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे काम स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत सुरू झाले आहे. आज घडीला जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून २७ कोटी ८५ लाख रुपये खर्च झाले असून जिल्ह्यातील ४८५ गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम पुर्ण झाले आहे. कामे पूर्ण झालेल्या गावात त्यामुळे आता पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागात गावामध्ये वाहणाऱ्या नाल्यामधील दूषित पाणी व गावातील केरकचरा यामुळे दुर्गंधी पसरून विविध आजाराला आमंत्रण मिळत होते. यावर उपाय म्हणून गावांमध्ये सांडपाण्यापासून होणारी दुर्गंधी तसेच ओला - सुका आणि प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना होत्या.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी संबंधित विभागाचे अधिकारी आणि विभागप्रमुख यांची बैठक घेऊन तालुकानिहाय आढावा घेतला. तालुकानिहाय कामाची जबाबदारी दिली. त्यानुसार गावागावात कामाचे नियोजन करण्यात आले आहे. गावागावात स्वच्छता व साफसफाई करणे, शोषखड्डे करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा संकलनासाठी जाळ्या व कचरा पेटी उभारणे यासह अन्य कामे करण्यात आली आहेत.

यासाठी गावकऱ्यांचीही मदत घेण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात एक हजार ३०९ ग्रामपंचायती असून त्या अंतर्गत एक हजार ५३४ गावे आहेत. त्यातील ४८५ गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अभियान राबवत सांडपाणी व घनकचऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गावाप्रमाणे शोषखड्ड्यांची निर्मिती

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामे करताना गावातील कुटुंबाच्या संख्येप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रति कुटुंब ३४० रुपये असा निधी खर्च करण्यात आला आहे. या उपक्रमात नालीचे दुषित पाणी शोषखड्डे करून जमिनीत मुरविण्यात येत आहे. मोठे गाव असेल तर त्या ठिकाणी १२ ते १५ शोष खड्डे आणि छोटे गाव असेल तर पाच ते सात शोष खड्डे घेण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT